राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या वतीने पुणे येथील हॉटेल सेंट लॉरीन, कोरेगाव पार्क येथे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी ‘व्यवसाय वृद्धी आणि कार्यात्मक कार्यक्षमता’ या विषयावर आयोजित कार्यशाळेस विशेष अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे सर यांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
यावेळी राज्यातील विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हा बँकांसमोरील विविध अडचणी, आर्थिक आव्हाने, व्यवसायवृद्धीच्या संधी आणि कार्यप्रणाली अधिक सक्षम करण्याबाबत दुर्गाडे सरांनी यावेळी सविस्तर चर्चा केली.
शेतकरी, सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अधिक सक्षम, आधुनिक, पारदर्शक आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सक्षम व्यवस्थापन यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे.
सहकार क्षेत्रातील अडचणी समजून घेत त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी अशा विचारमंथनातून निश्चितच सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास आहे.
सहकारातून समृद्धी, सक्षम जिल्हा बँका आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त शेतकरी हेच आपल्या विकासाचे ध्येय!
#सहकारक्षेत्र #नाबार्ड #जिल्हासहकारीबँक #ग्रामीणविकास #शेतकरीहित #सहकारातूनसमृद्धी #पुणे


