Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंस्कृत प्रेमी नागरिकांसाठी कात्रज येथे एक दिवसाच्या संमेलनाचे आयोजन!

संस्कृत प्रेमी नागरिकांसाठी कात्रज येथे एक दिवसाच्या संमेलनाचे आयोजन!

पुण्यातील कात्रज परिसरात रविवार दि. २४ डिसेंबर २०२३ संस्कृतप्रेमींसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन सकाळी १०.०० वाजता, माऊली गार्डन, कात्रज-कोंढवामार्ग, कात्रज, पुणे येथे संपन्न होणार आहे.

संस्कृत ही भारतीय प्राचीन भाषा सरळ, सोप्या अशा स्वरूपात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. संस्कृत भाषा संवर्धनासाठी संस्कृतभारती ही संस्था गेल्या ४५ वर्षांपासून निरंतर कार्यरत आहे. संस्कृत शिकण्याची इच्छा असणाऱ्या प्रौढांसाठी दहा दिवसांचे संस्कृत संभाषण शिबिर, पत्राचारद्वारा संस्कृतशिक्षण योजना, गीतेच्या माध्यमातून संस्कृत व्याकरणाचे शिक्षण तर लहान मुलांसाठी बालकेंद्र, सरला संस्कृत परीक्षा, प्रथमकक्षातः संस्कृतशिक्षणम् असे विविध वर्ग, उपक्रम संस्कृतभारती द्वारा राबविण्यात येतात. याच कार्याचा एक सर्वसमावेशक उपक्रम म्हणजे हे संमेलन होय.

संस्कृत भाषेचा प्रसार व्हावा आणि संस्कृत शिकण्याची इच्छा असणाऱ्या सर्व वयोगटातील लोकांना संस्कृतविषयक विविध वर्गांची, शिबिरांची, उपक्रमांची माहिती मिळावी या उद्देशाने संस्कृतप्रेमी लोकांचे हे संमेलन आयोजित केले आहे. हे संमेलन पूर्णपणे निःशुल्क असून संस्कृतची आवड असलेलेल्या सर्वांना मुक्त प्रवेश आहे.

या संमेलनात अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन, संस्कृतविषयक व्याख्याने, संस्कृतमधून संभाषण, गीतगायन, प्रदर्शनी, भाषा क्रीडा, इत्यादी विविध कार्यक्रम होणार आहेत. स्नेहभोजन तसेच संस्कृतविषयक पुस्तक विक्री केंद्रही असणार आहे.

संस्कृत भाषा प्रचाराच्या ध्येयाने प्रेरित होऊन आयोजित या संस्कृत संमेलनात सर्व संस्कृतप्रेमी, अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी. यांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन कात्रज संयोजिका सौ. मुक्ता मराठे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments