Sunday, November 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedबास्केटबॉल स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जुई गोडबोलेचे 'सुवर्ण-रौप्य' यश

बास्केटबॉल स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जुई गोडबोलेचे ‘सुवर्ण-रौप्य’ यश

 

पुणे,दि. २२ : नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी जुई गोडबोले हिने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेत शालेय क्रीडा स्पर्धेच्या राज्यस्तरीय निवड चाचणीसाठीही तिची निवड झाली आहे.

सातारा येथे पार पडलेल्या 51 व्या सब-ज्युनिअर राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत जुईने पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत तिने सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकावत आपली चमक दाखवली. या यशानंतर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे झालेल्या 51 व्या राष्ट्रीय (13 वर्षांखालील) बास्केटबॉल स्पर्धेत तिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेतही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तिने रौप्यपदकावर आपले नाव कोरले. जुईला प्रशिक्षक पूनम बुटी आणि संकेत कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, संचालक यशोवर्धन मालपाणी आणि अनिष्का मालपाणी तसेच शाळेच्या प्राचार्या संगीता राऊतजी यांनी तिचे व मार्गदर्शकांचे विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या या युवा शिलेदारांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments