Monday, November 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedकार्तिकी एकादशी यात्रेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहकार्याचा हात! 

कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहकार्याचा हात! 

 

 

 

 

वारकरी भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी महापौर रवि लांडगे यांचा पुढाकार; आळंदी नगरपरिषदेच्या शिष्टमंडळासोबत महत्त्वपूर्ण चर्चा..

 

 

 

पिंपरी-चिंचवड, दि. २३ नोव्हेंबर २०२६ :- आगामी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र आळंदी येथे दाखल होणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज आळंदी नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाने महापालिका मुख्यालयात महापौर रवि लांडगे यांची भेट घेतली.

 

 

 

यावेळी कार्तिकी एकादशी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्वच्छता, आरोग्यसेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच अन्य आवश्यक नागरी सुविधांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

 

 

वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जपणे आणि श्रीक्षेत्र आळंदी येथे येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही सामूहिक जबाबदारी आहे. या भावनेतून आळंदी नगरपरिषद व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने परस्पर समन्वयातून काम करावे, अशी भूमिका महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केली.

 

 

 

कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळ, स्वच्छता व्यवस्था, आरोग्यविषयक उपाययोजना व इतर सुविधांसाठी महापालिकेच्या संबंधित विभागांमार्फत सहकार्य उपलब्ध करून देण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

 

 

 

या बैठकीस आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांतभाऊ कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाताताई तापकीर, यात्रा समितीच्या सभापती पूजाताई घुंडरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, मा. भावार्थ देखणे, विश्वस्त मा. कबीरबुवा लोंढे, तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व विक्रांत बगाडे उपस्थित होते.

 

 

 

“श्रीक्षेत्र आळंदी ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची पवित्र भूमी आहे. कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या वारकरी भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणे, हे आमच्यासाठी भाग्याचे आहे. यात्रेच्या यशस्वी नियोजनासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आवश्यक ते सर्व सहकार्य करेल.”

 

 

 

— रवि लांडगे

 

महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments