Monday, November 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedPMPML पदोन्नती प्रक्रियेबाबत तत्कालीन CMD यांनी नेमलेल्या तीन सदस्यीय समितीचा अहवाल तातडीने...

PMPML पदोन्नती प्रक्रियेबाबत तत्कालीन CMD यांनी नेमलेल्या तीन सदस्यीय समितीचा अहवाल तातडीने जाहीर करा

पुणे -PMPML पदोन्नती प्रक्रियेबाबत तत्कालीन CMD यांनी नेमलेल्या तीन सदस्यीय समितीचा अहवाल तातडीने जाहीर करण्याची मागणी  माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यामध्ये नमूद केले आहे की

 

 

 

आमची पहिली आणि प्रमुख मागणी ही आहे की, तत्कालीन PMPML CMD यांनी नेमलेल्या तीन सदस्यीय समितीचा अहवाल शासनाने तातडीने जाहीर करावा. हा अहवाल गोपनीय नाही, यात राष्ट्रीय सुरक्षेचा कोणताही प्रश्न नाही. त्यामुळे तो जाहीर करण्यास कोणतीही अडचण नाही.

 

*श्री. डी. एम. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे यांनी दि. 19 नोव्हेंबर 2026 रोजी दिलेल्या निकालातील प्रमुख ठळक बाबी खालीलप्रमाणे आहेत:*

 

उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे आणि प्रमोदनाना भानगिरे यांनी पदोन्नती प्रक्रियेतील कथित नियमबाह्यतेबाबत चौकशीची मागणी केली होती.

 

त्यावर तत्कालीन CMD यांनी खालील तीन सदस्यीय समिती नेमली होती व 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते :

 

1. *श्रीमती ॲलिस पोरे – सहव्यवस्थापकीय संचालक* पीएमपीएमएल

2. *श्री. विजय थोरात – उपायुक्त, पुणे मनपा*

3. *श्री. सुरेश खेडेकर – मुख्य अंतर्गत लेखापरीक्षक* पीएमपीएमएल

 

*औद्योगिक कामगार न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे :*

 

*a) लिपिक पदोन्नती -*

दि. 30 जानेवारी 2026 रोजी आदेश क्र. 3170 द्वारे एकूण 198 कर्मचाऱ्यांना लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली होती. न्यायालयाने विशेषत्वे नोंदवले की, 100 पदांची निवड प्रक्रिया असताना प्रत्यक्षात 198 कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. आमचे म्हणणे हेच होते की, हे बेकायदेशीर आहे.

 

*b) कॉम्प्युटर ऑपरेटर पद -* जे भरले गेले, ते बेकायदेशीर नाही.

 

*c) कॉम्प्युटर प्रोग्रामर पद -* वाहक पदावर कार्यरत असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवून भरले आहे, तो त्यांचा अधिकार असू शकतो.

 

*d) बस स्टॅन्ड मॅनेजर -* 2013 च्या आस्थापना आराखड्यानुसार हे कर्मचारी प्रथमदर्शनी पात्र दिसत नाहीत.

 

*e) कामगार व कल्याण अधिकारी -* या पदाची नियुक्ती नियमानुसार नाही.

 

*f) वरिष्ठ फोरमन -* हा पदोन्नती संवर्ग आहे, त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना या पदावर पदोन्नती देणे प्रथमदर्शनी नियमबाह्य आहे.

 

*g) उपमुख्य व्यवस्थापक -* पदोन्नती देण्याची तरतूद प्रथमदर्शनी दिसत नसल्याने अशा नियुक्त्या पात्रतेनुसार नाहीत.

 

*h) जनसंपर्क अधिकारी -* या पदासाठी कार्यालय अधीक्षक किंवा सहाय्यक विधी अधिकारी हा पात्र संवर्ग असल्याने वाहकाची नियुक्ती प्रथमदर्शनी नियमानुसार नाही.

 

*i) सॉफ्टवेअर इंजिनियर -* दोन सफाई कर्मचाऱ्यांना सॉफ्टवेअर इंजिनियर पदावर पदोन्नती देण्यात आली होती. हे पद केवळ थेट भरतीने भरण्याची तरतूद आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवून पदोन्नती देण्याची तरतूद नाही. अशी नियुक्ती प्रथमदर्शनी पात्रतेनुसार दिसत नाही.

 

*j) न्यायालयाचा महत्त्वाचा निष्कर्ष -*

1. लिपिक पदाची प्रक्रिया प्रथमदर्शनी 2013 च्या आस्थापना आराखड्यानुसार असल्याचे दिसते.

2. कॉम्प्युटर ऑपरेटर पदाची प्रक्रिया प्रथमदर्शनी नियमबाह्य दिसत नाही.

3. कॉम्प्युटर प्रोग्रामर पदाची प्रक्रिया नियमबाह्य दिसत नाही.

4. *बस स्टॅन्ड मॅनेजर, कामगार व कल्याण अधिकारी, वरिष्ठ फोरमन, उपमुख्य व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी, सॉफ्टवेअर इंजिनियर या पदांवरील नियुक्त्या प्रथमदर्शनी 2013 च्या आस्थापना आराखड्याचे उल्लंघन करणाऱ्या असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.*

 

वरील सर्व न्यायालयाच्या आदेशाचा विचार करता आम्ही केलेले आरोप सिद्ध होत आहेत.

 

जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत पुढची कारवाई करता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की, तीन सदस्यीय समितीचा अहवाल शासनाने तातडीने जाहीर करावा.

 

या चुकीच्या बढत्या ज्या दिल्या गेल्या आहेत, त्यास दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी.

 

राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल असा हा अहवाल नसल्यामुळे, नगर विकास विभागाने अहवाल तातडीने जाहीर करावा.या निवेदनाच्या प्रती पुणे महापालिका आयुक्त आणि पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक यांना पाठविण्यात आल्या आहेत

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments