Tuesday, November 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedकिमान एका तरी व्यक्तीचे  जीवन घडवा!        ...

किमान एका तरी व्यक्तीचे  जीवन घडवा!                 – देवेंद्र भुजबळ 

 

 

प्रत्येक व्यक्ती स्वता:साठी, कुटुंबासाठी जगत असतेच आणि ते आवश्यकही आहेच पण या बरोबरच समाजातील वंचित घटकांतील किमान एका तरी व्यक्तिचे आयुष्य

घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान दिले पाहिजे , अशी अपेक्षा निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केली. प्रितगंध फाउंडेशन, मुंबई आणि शिवानी साहित्यिक मंच, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रितगंध फाउंडेशनच्या ११ व्या वर्धापनदिनी नुकताच त्यांना सपत्नीक

जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

 

श्री देवेंद्र भुजबळ पुढे म्हणाले की, प्रत्येक कामासाठी पैसेच हवे असतात असे नाही तर योग्य वेळी , योग्य व्यक्तीला

मार्गदर्शन करून, प्रसंगी धीर देऊनही गरजू व्यक्तिचे आयुष्य घडविण्यात आपण मोठा हातभार लावू शकतो. श्री

देवेंद्र भुजबळ आणि सौ

अलका भुजबळ यांना प्रसार माध्यमे, साहित्यिक, क्रिडा, सामाजिक कार्यातील सातत्यपूर्ण योगदानाबद्दल हा

जीवन गौरव पुरस्कार

26/ 11 च्या मुंबई बॉम्ब हल्ल्यामध्ये आरोपी अजमल कसाब याला जिवंत पकडून देणारे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्री मंगेश नाईक, प्राचार्य डॉ अलका नाईक आणि प्रितगंध फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संतोष महादेश्वर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

निवृत्त पोलीस उपनिरीक्षक

श्री मंगेश नाईक यांनी

26/ 11 च्या मुंबई बॉम्ब हल्ल्याच्या रोम हर्षक आठवणी जाग्या करून सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांनाही सपत्नीक जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष कवी श्री.संतोष तावडे आणि अॅड. भूमी मोरे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. ज्योती धारप (रोहा) यांनी सुंदर प्रस्तावना सादर केली.

 

या सोहळ्यात विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

 

या कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे श्री. संतोष म्हाडेश्वर यांच्या

” *नि:शब्द* ” आणि ” *उधार घेतलेले नशीब”* या दोन शॉर्ट फिल्मस् चे अनावरण, कवी मयूर प्रकाश ढोलम यांच्या ‘”काव्य संस्कार” या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले.

 

कवयित्री आरती धारप यांनी आपले सुंदर *गोंधळ* नृत्य सादर करून सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.

 

राज्याच्या विविध भागातून आलेल्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविली .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments