Tuesday, November 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयडीबीआय बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी करंडक 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत डीव्हीसीए...

आयडीबीआय बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी करंडक 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत डीव्हीसीए संघाचा दुसरा विजय

 

 

 

पुणे, 24 नोव्हेंबर 2026: बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी यांच्या वतीने आयोजित आयडीबीआय बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी करंडक 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत डीव्हीसीए संघाने दुसरा, तर केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने पहिला विजय नोंदवला.

 

सहकारनगर येथील शाहू कॉलेज क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात ऋषभ पवार(5-15) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने सहारा क्रिकेट अकादमी संघाचा 5 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना केदार जाधव क्रिकेट अकादमीच्या ऋषभ पवार(5-15), सर्वेश थरवाल(2-16) यांच्या भेदक माऱ्यापुढे सहारा क्रिकेट अकादमीचा डाव 26 षटकात सर्वबाद 108धावावर कोसळला. यात संस्कार ढवळे 17, अभिराम गोसावी नाबाद 35, ओंकार बेलदार 10 यांनी धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल हे आव्हान केदार जाधव क्रिकेट अकादमीने 15.1 षटकात 5बाद 112धावा करून पूर्ण केले. यात अनिरुद्ध कळसकरने 26चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह 48 धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला आनंदू नायर 26, प्रतीक कडलक 11, साई गुंजाळ 10 यांनी धावा काढून साथ दिली.

 

दुसऱ्या सामन्यात जय गोंदकर(52धावा व 2-8) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर डीव्हीसीए संघाने सहारा क्रिकेट अकादमी संघाचा 53 धावांनी पराभव करत दुसरा विजय मिळवला.

 

निकाल: साखळी फेरी:

सहारा क्रिकेट अकादमी: 26 षटकात सर्वबाद 108धावा(संस्कार ढवळे 17, अभिराम गोसावी नाबाद 35(28,4×4,2×6), ओंकार बेलदार 10, ऋषभ पवार 5-15, सर्वेश थरवाल 2-16) पराभूत वि.केदार जाधव क्रिकेट अकादमी: 15.1 षटकात 5बाद 112धावा(अनिरुद्ध कळसकर 48(26,8X4,2X6), आनंदू नायर 26, प्रतीक कडलक 11, साई गुंजाळ 10, शिवराज मंगळूरकर 3-31, अभिराम गोसावी 2-30); सामनावीर – ऋषभ पवार; केदार जाधव क्रिकेट अकादमी 5 गडी राखून विजयी.

 

डीव्हीसीए: 44.1 षटकात सर्वबाद 216धावा(योगेश पवार 51(45,11×4), जय गोंदकर 52(54,5×4,3×6), श्रेय अस्लेकर 25, ओम मोरे 24, अभिराम गोसावी 4-47, शिवराज मंगळूरकर 2-20, अद्वैत सुर्वे 2-20)वि.वि. सहारा क्रिकेट अकादमी: 37.5 षटकांत सर्वबाद 163धावा(वेद पटेल 32, अद्वैत सुर्वे 26, मयंक वर्मा 22, अथर्व मोरे 22, प्रताप पवार 3-15, जय गोंदकर 2-8, अथर्व काळे 2-19, अवनीश कुलकर्णी 2-37); सामनावीर – जय गोंदकर; डीव्हीसीए 53 धावांनी विजयी;

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments