पुणे,२१ डिसेंबर 2023 : आशियाई व मेडिटेरियन स्वादांच्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिध्द असलेल्या कायमा ने मुंबईतील दोन वर्षांत मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर पुण्यात आपला विस्तार करण्याची घोषणा केली आहे. कोप्पा मॉल येथे नुकतेच कायमाच्या पुण्यातील पहिल्या रेस्टोरंटचे उदघाटन करण्यात आले. कायमाच्या प्रवासाची सुरुवात ही मुंबईतील बीकेसी येथे सुरु झाली. ही माहिती पत्रकार परिषदेत शिवसागर समुहाचे संस्थापक नारायण पुजारी,कायमाचे व्यवस्थापकीय भागीदार निखिल रोचलानी,कायमाच्या संचालक निकिता पुजारी आणि कायमाच्या संचालक अंकिता पुजारी यांनी दिली.
शिवसागर समुहाचे संस्थापक नारायण पुजारी म्हणाले की, मुंबईतील अभूतपूर्व प्रतिसादानंतर पुण्यात सुरूवात करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. पुण्यातील विस्तार हा केवळ एक महत्त्वाचा टप्पा नसून स्वादिष्ट व अनोख्या खाद्यसेवेचा अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या कटिबध्दतेचे प्रतीक आहे. कायमा ब्रँडचा विस्तार संपूर्ण भारतभरात करण्याचा आमचा मानस आहे.
कायमाचे व्यवस्थापकीय भागीदार निखिल रोचलानी म्हणाले की, कायमा म्हणजे लाट. आम्ही आशियाई व मेडिटेरियन पाककृतींमध्ये समन्वय साधणार्या व आरामदायीपणा प्रदान करणार्या डायनिंग बारच्या कल्पनेने याची सुरुवात केली आहे. सर्वांना आवडेल व रोमांचक वाटेल यासाठी इंटिरियर,खाद्यपदार्थांपासून ते कॉकटेलपर्यंत रेस्टॉरंटची रचना करण्यात आली आहे.
कायमाच्या संचालक निकिता पुजारी म्हणाल्या की, मुंबईत दोन वर्षांत मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आमच्या सर्व ग्राहकांना आम्ही धन्यवाद देतो. पुण्यातील नवीन रेस्टॉरंटद्वारे पाककलेतील उत्कृष्टता आणि कायमाच्या चैतन्याच्या माध्यमातून ग्राहकांना अद्वितीय अनुभव देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना कायमाच्या संचालक अंकिता पुजारी म्हणाल्या की,कायमाचा प्रवास हा समर्पितता व दुरदर्शी दृष्टीकोनाचा मिलाफ असून लोकांना उत्कृष्ट चवीचे खाद्यपदार्थ व आरामदायी वातावरण प्रदान करणारी जागा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईतील दोन वर्षांत मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ,आम्ही पुण्यात देखील विस्तार करत आहोत. कायमा हे केवळ एक रेस्टॉरंट नसून आशियाई व मेडिटेरियन पाककला व आदरातिथ्याचे सौहार्दपणा प्रतिबिंबित करतो. पुण्यामध्ये कायमाची उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यास आम्ही उत्सुक आहोत. पुण्यातील खवय्यांना कायमाच्या उत्कृष्ट व अद्वितीय सेवेसह स्वादिष्ट पाककलेचा अनुभव देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
पुण्यातील नवीन रेस्टॅरंटसाठी कायमा क्लासिक्स व नाविन्यपूर्ण असा विशेष मेन्यू तयार करण्यात आला आहे. मेडिटेरियन खाद्य प्रकारांमध्ये प्रॉन्स रूबियन,चिकन शिश तावूक,इजिप्शियन कोषारी सिग्नेचर क्लासिक लेबनेह शुट कॉटेज चीज पॉकेटसचा यांचा समावेश आहे.आशियाई खाद्यपदार्थांमध्ये चीन चीन चू कॉटेज चीज,कायमा स्पेशल टेम्पुरा सुशी व ट्रफल एडामे डंपलिंग यांचा समावेश आहे.याबरोबरच केशर मिल्क केक,कुनाफा मिठाई व बकलावा चीजकेक अशा स्वादिष्ट पदार्थांचा देखील अनुभव घेता येणार आहे.


