तळेगाव – कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचारांनी मात करता येऊ शकते. या उद्देशाने तळेगाव येथील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या वतीने ३१ मे पर्यंत मोफत ओपीडी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत याठिकाणी या मोफत ओपीडीचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
सर्वोत्तम कँन्सर रूग्णालय म्हणून ओळखल्या जाणा-या टिजीएच – आँन्को लाईफ कँन्सर सेंटरने वैदयकिय विश्वात कर्करोगींमध्ये आशेचा किरण निर्माण केला आहे.
अद्ययावत तंत्रप्रणालीसह, अनुभवी डाँक्टरांच्या सहाय्याने रेडिएशन, केमोथेरपी व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याठिकाणी डॉ रविकुमार वाटेगावकर(मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट), डॉ जयपालरेड्डी पोगल(सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट), डॉ गौरव जसवाल( रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट),डॉ अभिषेक पुरकायस्थ (रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट), डॉ जयंत गावंडे (मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट), डॉ ज्योती मेहता (रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट), डॉ सारंग वाघमारे (हेमॅटोलॉजिस्ट), डॉ मृणाल परब(सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट) या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
सेंटरमधील तज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी हे उच्च दर्जाचे कॅन्सर प्रशिक्षण घेतलेले कॅन्सर तज्ञ आहेत. पुर्वी कर्करोग म्हटल्यावर रूग्ण आणि नातेवाईक पुर्णत: कोलमडून जायचे परंतू आता जनमानसात त्याबद्दल झालेली जनजागृती आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे या रूग्णांचे जीवनमानही वाढले आहे. रूग्णसेवा हा एकमेव उद्देश बाळगून अधिकाधिक जनजागृती करण्याचा प्रयत्न या सेंटरच्या माध्यमातून केला जात आहे. जास्तीज जास्त नागरिकांनी टीजीएच- ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर वतीने आयोजित मोफत ओपीडीचा लाभ घ्यावा असे आव्हान सेंटरच्या वतीने केले जात आहे.
मोफत ओपीडीचा लाभ घेण्यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक असून अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधायला विसरु
नका.


