पुणे,16 एप्रिल 2024 : 23 एप्रिल रोजी साजरा होणार्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुणे वर्ल्ड बुक डे उपक्रम हा महिनाभराचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.नुक्कड कॅफे तर्फे आयोजित या उपक्रमाला पुणे महानगरपालिका, एनएचआरडी पुणे चॅप्टर,एमआयटी डब्ल्यूपीयू, अमर चित्र कथा,ग्योथं इन्स्टिट्युट,राह,कोक्रिएटर्स अॅन्ड कंपनी,कहानी,रेन्बो फीज कॅफे यासारख्या संस्थांचे सहकार्य लाभले आहे.या व्यापक उपक्रमामध्ये लेखकांशी संवाद,पुस्तक प्रकाशन, कार्यशाळा,पुस्तक प्रदर्शन,स्टोरी टेलिंग,पुस्तक वाचन आणि चर्चा अशा अनेक उपक्रमांचा सहभाग आहे.हा उपक्रम 6 एप्रिल रोजी सुरू झाला असून 27 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे.या उपक्रमांतर्गत नुकतेच अमर चित्र कथाच्या वतीने ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले.या संपूर्ण उपक्रमामध्ये सोनाली रसाळ, प्रिता भुयान, अमन राजाबली, भूपेश महाजन सारख्या पुण्यातील लेखकांचे पाठबळ लाभले आहे.


