Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedबॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यन सोनी स्पोर्ट्स नेटवर्कचा फुटबॉल ब्रॅंड अॅम्बेसिडर ~...

बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यन सोनी स्पोर्ट्स नेटवर्कचा फुटबॉल ब्रॅंड अॅम्बेसिडर ~ सोनी स्पोर्ट्स वाहिनीने ‘ Your Home of Football’ या वेगळ्या कार्यक्रमाला सुरुवात केली असून, यामध्ये कार्तिक आर्यन आपल्या फुटबॉल खेळावरील प्रेमाविषयी बोलणार आहे~

भारतातील फुटबॉलचे सर्वाधिक प्रक्षेपण करणाऱ्या सोनी स्पोर्टस वाहिनीने बॉलिवडूचा अभिनेता आणि युवकांमध्ये आकर्षण असणाऱ्या कार्तिक आर्यनशी हात मिळवला असून, आता तो सोनी स्पोर्ट्स वाहिनीनचा फुटबॉल ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून ओळखला जाणार आहे. वाहिनीशी झालेल्या करारानुसार पुढील वर्षभर कार्तिक वाहिनीवरून फुटबॉलच्या थेट प्रक्षेपणाचा प्रसार करणार आहे. यामध्ये प्रमुख फुटबॉल स्पर्धांबरोबरच लीगमधील ९०० हून अधिक सामन्यांचा समावेश आहे. प्रमुख स्पर्धांमध्ये युरो २०२४, युईएफए चॅम्पियन्स लीग, युईएफए युरोपा लीग, युईएफए कॉन्फरन्स लीग , युईएफए नेशन्स लीग, बुंडेसलिगा, एमिरातस एफए करंडक, ड्युरंड करंडक आणि रोश्न सौदी लीग अशा स्पर्धांचा समावेश आहे.

रुपेरी पडद्यावर आपल्या संयम अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा कार्तिक आर्यनचे फुटबॉल प्रेम सर्वश्रुत आहे. वेळोवेळी कार्तिकने हे दाखवून दिले आहे. फुटबॉलवरील कार्तिकचे फ्रेम लहान वयातच सुरु झाले. युईएफए चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी क्लब असलेल्या रेयाल माद्रिदचा तो जबरदस्त चाहता आहे.

प्रतिक्रिया:
राजेश कौल, मुख्य महसूल अधिकारी-वितरण आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रमुख-क्रीडा व्यवसाय-सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया:
“सोनी स्पोर्ट्स नेटवर्कसाठी कार्तिक आर्यनला ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून घोषित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. कार्तिक हा रुपेरी पडद्यावरचा खरा अभिनेता असून फुटबॉलचा तो जबरदस्त फॅन आहे. प्रेक्षकांची संवाद साधण्याची त्याच्याकडे कला आहे. कार्तिक आर्यनच्या माध्यमातून भारतीय तरुणांशी संपर्क साधणे आणि आणच्या वाढणाऱ्या फुटबॉल दर्शकांशी सखोल संबंध ठेवण्याचे आमचे ध्येय आहे. यामध्ये विविध प्रकारच्या ९००फुटबॉल सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचा सामम्यांचा समावेश आहे.”

कार्तिक आर्यन, बॉलिवूड अभिनेता आणि सोनी स्पोर्ट्स वाहिनीचा फुटबॉल ब्रॅण्ड अॅम्बेसिडर:
“मी लहानपणापासून फुटबॉलचा जबरदस्त फॅन आहे. माझ्या हृदयाच्या जवळ असलेल्या या खेळाला प्रोत्सहन देण्यासाठी सोनी स्पोर्टस वाहिनीसोबत भागीदारी करण्याचा मला संधी मिळाली हे मी भाग्य समजतो. सोनी स्पोर्टस वाहिनीवर पुढील वर्षासाठी युईएफए युरो २०२४ पासून युईएफए चॅम्पियन्स लीग, बुंडेसलिगा आणि अन्य अनेक फुटबॉल सामन्यांचे थेट प्रसारणा करण्यात येणार आहे. या सामन्यांच्या थेट प्रसारणासाठी मी कमालीचा उत्सुक आहे. या सामन्यांतून जगभरातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंचा खेळ पाहण्याची संधी घरबसल्या मिळणार आहे. माझ्या आवडत्या फुटबपॉलपटूंना खेळताना पाहण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी मी कमालीचा उत्सुक आहे.”

भारतीय प्रेक्षकांच्या व्यापक स्तरापर्यंत पोहचण्यासाठी आणि त्यांना खेळाच्या जवळ आणण्याच्या दृष्टिकोनातून ‘ यूअर होम फुटबॉल’ योजनेतील पहिल्या फिल्मचे प्रदर्शन केले जाणार आहे. यानंतर आठवड्यात कार्तिक आर्यनची भूमिका असलेलेल्या अन्य तीन फिल्मस प्रदर्शित केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये वाहिनीचे फुटबॉल सामन्यांच्या प्रसारणाची माहिती आणि कार्तिकचे फुटबॉल प्रेम दिसून येणार आहे.

फिल्म: एव्हरी फुटबॉल फॅन इज डिफरन्ट

विविध फुटबॉल संघांच्या चाहत्यांना एकाच वेळी वाहन करणारी ही फिल्म सोनी नेटवर्कवरून प्रसारित करण्यात येत आहे. सोनी नेटवर्कच्या फुटबॉलवरील प्रेमाचे दर्शन या फिल्ममधून घडते. यामध्ये कार्तिकने विविध फुटबॉल संघ आणि लीग स्पर्धांच्या पाठीराख्यांचे दर्शन घडविताना विविध प्रकरच्या जर्सी परिधान केल्या आहेत. या सगळ्यातून एकच सामायिक गोष्ट तुमच्यसमोर मांडण्यात आली आहे, ती म्हणजे सर्व फुटबॉलप्रेमींसाठी एकच एक लक्ष्य आहे… ते म्हणजे सोनी स्पोर्ट्स नेटवर्क…!

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments