Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedगीत रामायणातील सलग ५६ गीत सादरीकरणाचा पुण्यात 'हटके' कार्यक्रम शनिवारी (दि. २०)*...

गीत रामायणातील सलग ५६ गीत सादरीकरणाचा पुण्यात ‘हटके’ कार्यक्रम शनिवारी (दि. २०)* *हटके म्युझिक ग्रुप तर्फे आयोजन : तब्बल २५ हून अधिक कलाकारांचे सलग ९ तास सादरीकरण*

 

 

पुणे : गीतरामायणाचा सांगितिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न आजही अनेकजण करत आहेत. त्यामुळे हटके म्युझिक ग्रुपच्या वतीने देखील पुण्यात एक अनोखा प्रयोग होत आहे. एकाच व्यासपीठावर एकाच दिवशी गीत रामायणातील ५६ गीतांचे तब्बल २५ हून अधिक कलाकार सलग ९ तास सादरीकरण करणार आहेत. सदाशिव पेठेतील रेणुका स्वरूप शाळेमागील म. ए. सो भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात शनिवार, दिनांक २० एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत ‘ संपूर्ण दिवस गीतरामायणाचा’ हा कार्यक्रम होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती हटके म्युझिक ग्रुपचे संस्थापक शिरीष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

पत्रकार परिषदेला माधव धायगुडे, सुमेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 

शिरीष कुलकर्णी म्हणाले, आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर आणि गानश्रेष्ठ बाबूजी उर्फ सुधीर फडके यांची अजरामर कलाकृती म्हणजे गीतरामायण. त्यामुळे गीत रामायणाचा वसा जपण्यासाठी हा अनोखा कार्यक्रम करण्यात येत आहे. सुरुवातीपासूनच हटके ग्रुपला प्रत्येक वेळी काहीतरी वेगळे व नावीन्यपूर्ण करण्याची इच्छा होती. त्यानुसार या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

 

माधव धायगुडे म्हणाले, कार्यक्रम चार सत्रांमध्ये होणार असून सकाळी ९ वाजता उद्घाटन होणार आहे. यावेळी गदिमा यांच्या सुकन्या कल्पलता अंतरकर आणि सुपुत्र आनंद माडगुळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शाळेच्या आवारात विविध प्रकारची पुस्तके व इतर वस्तूंचे स्टॉल देखील रसिकांसाठी उपलब्ध असणार आहेत.

 

गीत रामायणातील निवडक गाण्यांचे कार्यक्रम अनेक ठिकाणी होतात. मात्र एक सलग ५६ गीते सादर करण्याचे शिवधनुष्य हटके ग्रुपने पेलले आहे. याकरिता मागील सहा महिन्यांपासून तयारी सुरू आहे. सादरीकरण करणारे कलाकार हे हौशी कलाकार असून विविध क्षेत्रात नोकरी व्यवसायात कार्यरत आहेत. गदिमा आणि बाबूजींनी दिलेला सांगीतिक वारसा जपण्याकरिता तसेच हा अनमोल ठेवा रसिकांसमोर आणण्याकरिता कलाकारांचा हा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम विनामूल्य खुला असून पुणेकरांनी या कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हटके म्युझिक ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments