Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedबाल चित्रपट महोत्सव उद्यापासून

बाल चित्रपट महोत्सव उद्यापासून

    दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्यातील बाल गोपालांचे मोठ आकर्षण असलेल्या बाल चित्रपट महोत्सवाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून दि. १९ ते २५ एप्रिल या कालावधीत सिटी प्राईड कोथरूड येथे हा मोहोत्सव संपन्न होईल. मोहोत्सवाच्या कालावधीत रोज सकाळी १० वाजता बाल गोपाळांना मोफत चित्रपट दाखवले जाणार आहेत. ‘संवाद पुणे आणि कावरे आईसक्रीम’ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही या मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपटासाठी येणाऱ्या बाल गोपाळांना कावरे आईसक्रीम तर्फे मोफत आईसक्रीम दिले जाणार आहे.

 

या चित्रपट मोहोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सिटी प्राईड कोथरूड येथे ‘श्यामची आई’ चित्रपटात छोट्या श्यामची अप्रतिम भूमिका साकारणारा बालकलाकार शर्व गाडगीळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, कोहिनूर ग्रुपचे कृष्कुमार गोयल, बढेकर ग्रुपचे प्रवीण बढेकर आणि सिटी प्राईड कोथरूडचे अरविंद चाफळकर यांच्या हस्ते संपन्न होईल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments