Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांची दि. १९ एप्रिल रोजी कसबा गणपतीपासून...

महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांची दि. १९ एप्रिल रोजी कसबा गणपतीपासून पदयात्रा

 

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शुक्रवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पुण्याचे ग्राम दैवत श्री. कसबा गणपतीचे दर्शन घेऊन कसबा विधानसभा मतदार संघाततील पदयात्रेचा प्रारंभ करणार आहेत. त्यांच्या सोबत काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी आणि अन्य मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. इथून पुढे रोज सकाळ संध्याकाळ एका विधानसभा मतदार संघातील जीप / पदयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे असे पुणे लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख व माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले.

दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता श्री कसबा गणपती येथून सुरु होणारी पदयात्रा लाल महाल – एच. व्ही. देसाई कॉलेज – कडबे आळी तालीम – हरिहरेश्वर मंडळ – वीर मारूती – आहिल्या देवी चौक – गाडगीळ निवास – मेहुणपुरा – मंदार लॉज – कन्या शाळा – बालविकास – सुयोग मंगल कार्यालय – शिंदे पार – रमणबाग शाळा – केसरी वाडा – माती गणपती – गोगटे शाळा – मोदी गणपती – मा. बाळासाहेब दाभेकर यांचे कार्यालय – पत्र्या मारूती चौक – लोखंडे तालीम – कुंठे चौक – लक्ष्मी रोड – विजय टॉकीज चौक गरूड गणपती – जोंधळे चौक – कुमठेकर रोड – खालकर तालिम चौक – कुंजीर तालिम हौद – स्विट होम – श्री मिसळ – विष्णुप्रसाद सभागृह – रिध्दी सिध्दी गणपती – सावजी बिर्याणी – राजाराम मंडळ – ज्ञानप्रबोधीनी – निंबाळकर सायकल मार्ट – ब्राम्हण मंगल कार्यालय – नागनाथ पार – शनी पार – लक्ष्मीड्राय फ्रुट – सुजाता मस्तानी – खुन्या मुरलीधर चौक – शिवाजी मंदिर – पेरूगेट पोलीस चौकी – भावे हायस्कूल – हत्ती गणपती – दुर्वांकुर हॉटेल – महाराष्ट्र मंडळ – टिळक स्मारक मंदिर – शेडगे आळी – भरत नाट्य मंदिर – सहस्त्रबुध्दे दत्त मंदिर – चिमण्या गणपती – वंदे मातरम चौक – भिकारदास मारूती चौक – खजिना विहिर – एस.पी. कॉलेज चौक येथे समाप्त होईल.

श्री गजानन महाराज मंदिर येथून

सायंकाळी ४.३० पासून जीप / पदयात्रा

सायंकाळी ४.३० वाजता पर्वती विधानसभा मतदार संघातील श्री गजानन मंदिर चौक ( लक्मी नगर ) येथून जीप / पदयात्रा सुरु होणार आहे यामध्येही काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी आणि अन्य मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. श्री गजानन महाराज मंदिर चौक – बागुल उद्यान कमान – शशिकांत तपकीर यांचे घर – आबा बागुल यांचे घर – हरीश यादव यांचे घर – राहुल युवक मंडळ – शनी मंदिर- तावरे कॉलनी – संजय नगर – शिंदे हायस्कूल – तावरे बेकारी – ट्रेजर पार्क – मोगल वसाहत – गोल मंदिर- सहकार नगर पोलीस स्टेशन – नवजीवन चौक – खांडेकर शाळा – दाते बसस्टॉप – महात्मा गांधी चौक – लक्ष्मण उकीरंडे यांचे रेशन दुकान पासून आत – खंडाळे चौक – ओम मित्र मंडळ चौक – लुंकड शाळा – विणकर सभागृह – संतोष पवार – तीन हत्ती चौक – संभाजी नगर – अनिल सातपुते यांचे घर – शंकर महाराज वसाहत – सातारा रोड येथे समाप्त होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments