पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत पुढील वर्षीपासून अंतरराष्ट्रीय बालचित्रपट मोहोत्सव आयोजित करण्यात येणार असून, विविध देशांमधील बाल चित्रपट बघण्याची संधी पुण्यातील लहान मुलांना त्यामुळे मिळेल असे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज घोषित केले.
‘सवांद पुणे’ तर्फे दि. १९ ते २५ एप्रिल या कालावधीत सिटी प्राईड कोथरूड येथे आयोजित रौप्य मोहोत्सवी बालचित्रपट मोहोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी ‘श्यामची आई’ चित्रपटात छोट्या श्यामची भूमिका करणारा बाल कलाकार शर्व गाडगीळ, ‘कोहिनूर’ ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, बढेकर ग्रुपचे प्रविण बढेकर, कावरे आईस्क्रिमचे राजूशेठ कावरे आणि जान्हवी कावरे, सिटी प्राईड कोथरूडचे अरविंद चाफळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच सुनिल महाजन, केतकी महाजन बोरकर, प्रोग्राम डायरेक्टर विशाल शिंदे आणि प्रसाद मिरसदार देखील उपस्थित होते. या प्रसंगी केतकी महाजन बोरकर यांनी प्रास्ताविक केले तसेच लहान मुलांच्या हस्ते हवेत फुगे सोडून उद्घाटन केले गेले. लहान मुले व पालकांनी मोठी गर्दी केली होती.
माझी भूमिका असणारा ‘श्यामची आई’ चित्रपट बघायला माझे एव्हढे बालमित्र जमले आहेत हे बघून खूप आनंद झाला. बालचित्रपट मोहोत्सवातील सर्व चित्रपट हाउस फुल झालेत हे बघून भारी वाटले असे मत ‘श्यामची आई’ चित्रपटात छोट्या श्यामची भूमिका साकारणाऱ्या शर्व गाडगीळ यानी व्यक्त केले.
कृष्कुमार गोयल म्हणाले की, आज ‘श्यामची आई’ चित्रपट बघायला आलेली सर्व लहान मुले भाग्यवान आहेत कारण या चित्रपट हिरो असणारा बाल कलाकार त्यांच्या सोबत आहे.
बढेकर ग्रुपचे प्रविण बढेकर म्हणाले की, असे चित्रपट मोहोत्सव वारंवार आयोजित व्हावेत कारण या चित्रपटातून चांगले संस्कार लहान मुलांवर होतात.
कावरे आईस्क्रिमचे राजूशेठ कावरे म्हणाले की, आज बाल चित्रपट बघायला आलेल्या लहान मुलांच्या पालकांना त्यांच्या पालकांनी बाल चित्रपट दाखवले होते हा वारसा असाच चालू राहिला पाहिजे. या चित्रपट मोहोत्सवात येणाऱ्या लहान मुलांना कावरे आईस्क्रिम तर्फे मोफत आईस्क्रिम दिले जाईल असे ते म्हणाले.
प्रारंभी संयोजक ‘संवाद पुणे’ चे अध्यक्ष सुनिल महाजन यांनी सर्वांचे स्वागत केले ते म्हणाले गेली २५ वर्षे मी बाल चित्रपट मोहोत्सव आयोजित करीत आहे. गेली २५ वर्षे पुण्यातील लहान मुले व त्यांचे पालक यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे मन भरून आले आहे. पुढील वर्षी अंतरराष्ट्रीय बाल चित्रपट मोहोत्सवासही पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास सुनिल महाजन यांनी व्यक्त केला.


