Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडियाकडून 'ग्रामीण महोत्‍सव'

ह्युंदाई मोटर इंडियाकडून ‘ग्रामीण महोत्‍सव’

गुरूग्राम, १९ एप्रिल २०२४: ह्युंदाई मोटर इंडिया लि. (एचएमआयएल)ने भारताच्‍या ग्रामीण भागांमधील आपली उपस्थिती अधिक दृढ करण्‍यासाठी मिशन सुरू केले आहे. देशाच्‍या कानाकोपऱ्यामधील ग्राहकांच्‍या विविध गरजा जाणून घेत ह्युंदाई मोटर इंडियाने ग्रामीण भारताच्‍या महत्त्‍वाला साजरे करणारा वैविध्‍यपूर्ण उपक्रम ‘ग्रामीण महोत्‍सव’ सुरु केला आहे. कंपनीच्‍या एकूण विक्रीमध्‍ये ग्रामीण भागांमधील विक्रीचे १९ टक्‍क्‍यांहून अधिक योगदान असण्‍यासह एचएमआयएल ग्रामीण समुदायांसोबतचे नाते प्रबळ करण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

 

ग्रामीण महोत्‍सव अंतर्गत, ह्युंदाई सर्वसमावेशक अॅक्टिव्हिटीज राबवत आहे जसे लक्षवेधक उत्‍पादन प्रदर्शन, परस्‍परसंवादी प्रात्‍यक्षिके आणि सर्वोत्तम ग्राहक अनुभव जसे नुक्‍कड नाटक, लाइव्‍ह म्‍युझिक, लोकनृत्‍य आणि प्रादेशिक टॅलेंट शोज. ग्रामीण महोत्‍सवाच्‍या दुसऱ्या दिवशी भारतभरातील १६ ठिकाणी कार्निवलचे आयोजन करण्‍यात येईल, ज्‍यामध्‍ये वैविध्‍यपूर्ण बाजारस्‍थळाला दाखवण्‍यात येईल, ज्‍याममध्‍ये कारागीरांची कलाकुसर, कार्निवल राइड्स, गेमिंग झोन्‍स आणि स्‍वादिष्‍ट फूड स्‍टॉल्‍सचा समावेश असेल. साजरीकरणाव्‍यतिरिक्‍त ग्रामीण महोत्‍सव ह्युंदाईसाठी ग्रामीण बाजारपेठांच्‍या व्‍यापक क्षमता जाणून घेण्‍याकरिता प्‍लॅटफॉर्म म्‍हणून सेवा देते. समुदाय आणि सूक्ष्‍मदर्शी बाजारपेठ ट्रेण्‍ड्ससोबत संलग्‍न होत एचएमआयएलच्‍या विकसित होत असलेल्‍या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्‍यासोबत नवीन ग्राहकांना ओळखण्‍याचा आणि ह्युंदाई कुटुंबामध्‍ये त्‍यांचे स्‍वागत करण्‍याचा मनसुबा आहे.

 

या उपक्रमाप्रती आपला आनंद व्‍यक्‍त करत ह्युंदाई मोटर इंडिया लि.चे सीओओ श्री. तरूण गर्ग म्‍हणाले, ”ग्रामीण भागांमधील उपस्थिती वाढवण्‍याप्रती आमच्‍या शाश्‍वत प्रयत्‍नांना यश मिळत आहे आणि ह्युंदाई मोटर इंडियाला आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्‍ये ग्रामीण बाजारपेठांत मोठी वाढ दिसण्‍यात आली आहे. आम्‍ही गेल्‍या वर्षी भारतातील ग्रामीण भागांमध्‍ये १.१५ लाख वेईकल्‍सची विक्री केली, ज्‍यामध्‍ये २०२२-२३च्‍या तुलनेत ११ टक्‍क्‍यांची वाढ झाली. आम्‍हाला विश्‍वास आहे की उत्तम पावसाचा अंदाज, वाढते उत्‍पन्‍न आणि सुधारित पायाभूत सुविधांसह ग्रामीण बाजारपेठांमधील योगदान अधिक वाढेल. अपकंट्री बाजारपेठांच्‍या क्षमतेवरील आमचा विश्‍वास आणि सर्व भौगोलिक क्षेत्रांमधील भारतीय ग्राहकांच्‍या विकसित होत असलेल्‍या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्‍याप्रती समर्पितता या विकासाला अधिक गती देईल.”

 

ते पुढे म्‍हणाले, ”ह्युंदाई मोटर इंडियामध्‍ये आमचा दृढ विश्‍वास आहे की देशाने समृद्ध होण्‍यासाठी भारत व इंडियाने एकत्रित प्रगती केली पाहिजे. ग्रामीण महोत्‍सव सारख्‍या उपक्रमांसह आम्‍हाला देशाच्‍या कानाकोपऱ्यामधील ग्राहकांना निपुण करण्‍याची आशा आहे, तसेच आम्‍हाला त्‍यांच्‍या अपेक्षांची पूर्तता करण्‍यासाठी बाजारपेठ ट्रेण्‍ड्स देखील माहित आहेत. आम्‍ही नाविन्‍यता आणण्‍यासोबत ग्रामीण ग्राहकांसोबत संलग्‍न होत असताना आम्‍हाला देशाच्‍या सर्वांगीण विकासाप्रती योगदान देण्‍यासाठी आमच्‍या क्षमतेमध्‍ये विश्‍वास आहे.”

 

डिलर्स, ग्रामीण प्रभावक, फायनान्शियर्स, ग्राहक आणि त्‍यांच्‍या कुटुंबांशी संलग्‍न होत ह्युंदाई मोटर इंडिया ब्रँड आवाहन वाढवण्‍यासाठी, तसेच ग्रामीण बाजारपेठांमधील विक्रीला गती देण्‍यासाठी प्रबळ नेटवर्क निर्माण करत आहे. पहिलाच ग्रामीण महोत्‍सव इव्‍हेण्‍ट एप्रिल २०२४ मध्‍ये महेमदावाद, गुजरात येथे यशस्‍वीरित्‍या आयोजित करण्‍यात आला. आता आम्‍ही या उपक्रमाची पोहोच व प्रभाव ग्रामीण भागांपर्यंत वाढवण्‍यास उत्‍सुक आहोत. ग्रामीण महोत्‍सव सारख्‍या उपक्रमांसह ह्युंदाई संबंधांना चालना देण्‍यासाठी, बाजारपेठ गतीशीलता समजून घेण्‍यासाठी आणि देशाच्‍या सर्वांगीण विकासाप्रती योगदान देण्‍यासाठीच्‍या मिशनप्रती कटिबद्ध आ

हे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments