भारतातील आघाडीच्या बिस्किट आणि बेकरी ब्रँड बिस्क फार्मने आज आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिच्या बरोबर भागीदारी करत तिची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले. अष्टपैलू, पुरस्कार विजेती अभिनेत्री ‘रस्किट ब्रँड’चा चेहरा असेल. हा ब्रॅंड म्हणजे चहा सोबत खायच्या ४ वेगवेगळ्या प्रकारांमधल्या कुरकुरीत बेक्ड टोस्टची स्वादिष्ट श्रेणी सादर करतो. बिस्क फार्म हे नाविन्यपूर्णता, गुणवत्ता आणि चव यासाठी ओळखले जाते आणि रश्मिका मंदना सोबत, हा ब्रँड बा:’/.जारपेठेत लक्षणीय स्थान निर्माण करण्यासाठी आणि संपूर्ण भारतभरातील घरोघरी नावाजले जाण्याच्या शोधात नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज आहे.
रश्मिका मध्ये असलेली आकर्षक ऊर्जा आणि चैतन्यशील व्यक्तिमत्त्व यांच्या साथीने ती बिस्क फार्मच्या उत्पादनांच्या आकर्षक श्रेणीद्वारे ग्राहकांना आनंद आणि खुषी देण्याच्या बांधिलकीला प्रतिबिंबित करते. बिस्क फार्म कंपनीच्या एकूण महसुलात महत्त्वपूर्ण योगदान देणार्या रस्क श्रेणीमध्ये आपले स्थान मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पेडीग्रीच्या साथीने स्थानिक रस्कमध्ये येण्याचा फायदा घेत, बिस्क फार्म रस्किट ने यशस्वीपणे भारतीय पॅलेटमध्ये खोलवर प्रवेश केला आहे.
या भागीदारीबद्दल उत्साह दर्शवत यावेळी बोलताना बिस्क फार्मचे व्यवस्थापकीय संचालक श्री.विजय सिंग म्हणाले, “बिस्क फार्म कुटुंबात आमची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून रश्मिका मंदान्नाचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. तिचे निर्विवाद आकर्षण आणि व्यापक अपील आनंद, ताजेपणा आणि चव यांचे दुसरे नाव असलेल्या बिस्क फार्मच्या आकांक्षेला मूर्त रूप देते. मिलेनियल प्रेक्षकांशी असलेले तिचे मजबूत कनेक्शन आमच्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि प्रमुख बाजारपेठेत आमचे स्थान आणखी मजबूत करण्यासाठी तिची योग्य निवड सार्थ ठरवते. महसुलात लक्षणीय वाढीकरता संपूर्ण देशात सखोल स्तरावर ग्राहकांशी जोडलेले राहण्यासाठी आणि सादरीकरणाला आकार देण्यात महत्वपूर्ण सहयोगी म्हणून रश्मिका सोबतच्या एका रोमांचक प्रवासाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”
ब्रँडशी जोडल्याबद्दल उत्साह व्यक्त करताना रश्मिका मंदान्ना म्हणाली, “बिस्क फार्म हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या FMCG ब्रँडपैकी एक आहे, आणि विकास आणि नावीन्यता याविषयीची त्यांची बांधिलकी माझ्या मनात खोलवर रुजली आहे. मला विश्वास आहे की ही भागीदारी फलदायी ठरेल आणि मी बिस्क फार्मच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक उत्पादनांद्वारे माझ्या चाहत्यांशी संपर्क साधण्यास उत्सुक आहे.”
भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बिस्किट आणि बेकरी ब्रँड असलेल्या साज फूड प्रॉडक्ट्सचे बिस्क फार्म या त्यांच्या प्रमुख ब्रँडला खऱ्या अर्थाने राष्ट्रीय ब्रँडमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टिकोनाला सुसंगत आर्थिक वर्ष २०२९ पर्यंत ५००० कोटी रुपयांच्या महसुलाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचा BISK FARM, करण्याच्या दृष्टीकोनाशी संरेखित आहे. RUSKIT ब्रँडचा चेहरा म्हणून “द नॅशनल क्रश ऑफ इंडिया” ही उपाधी लाभलेल्या अभिनेत्री रश्मिका मंदान्नाशी सहयोग करण्याचे धोरणात्मक पाऊल हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पायरी आहे.
या घोषणेच्या अनुषंगाने, बिस्क फार्मने रश्मिका मंदान्नाच्या अष्टपैलुत्व आणि खेळकर व्यक्तिमत्वा सोबत RUSKIT च्या समाधानकारक, तृप्त क्रंचची परिपूर्ण जोडी साजरी करणारी एक विलक्षण, रोमांचक मोहीम देखील उघडली आहे. या मोहिमेमध्ये ख्यातनाम अभिनेत्रीची ओळख मीना भाई नावाच्या पात्राच्या रुपात करण्यात आली आहे. ही एक अशी डॉन आहे जी धामधूम असलेल्या बाजारपेठेला हलवून सोडत असते. #TheresNoTeaWithoutRUSKIT या सह मीना भाईला प्रत्येक कपामध्ये जादू दिसते आणि ही मोहीम दर्शकांना एका खेळकर, आनंदी प्रवासाला घेऊन जाते. टॅगलाइन या मोहिमेचे सार उत्तम प्रकारे ग्रहण करते, रस्किटचे अप्रतिम फ्लेवर्स आणि समाधानकारक क्रंच हे एका परिपूर्ण चहाच्या कपासोबत कसे आवश्यकच आहेत यावर प्रकाश टाकते.
संपूर्ण भारतात स्थान निर्माण करण्यावर लक्ष ठेवून साज फूड कर्नाटक आणि इतर दक्षिणेकडील राज्यांमधील प्रमुख बाजारपेठांवर विशेष लक्ष केंद्रित करत बाजारपेठेत सखोल प्रवेशासाठी सज्ज आहे. आपल्या वाढीच्या महत्त्वाकांक्षेला चालना देण्यासाठी आणि त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी साज फूडने मार्च २०२२ मध्ये बेंगळुरू, कर्नाटक येथे आपले सहावे केंद्र सुरू केले. मजबूत ब्रँड दृष्टीकोन, धोरणात्मक विस्तार योजना आणि लोकप्रिय सेलिब्रिटींचे पाठबळ यांसह साज फूड पुढील वर्षांमध्ये लक्षणीय विकासासाठी तयार आहे.
TVC येथे पहा: https://www.youtube.com/watch?v=ionV3gradmc
रुस्किट ब्रँडमध्ये चार स्वादिष्ट प्रकार आहेत- बटर रस्किट, मिल्क रस्किट, केक रस्किट आणि रस्किट गोल्ड.