मुंबई, १९ डिसेंबर, २०२३: भारतातील सर्वात मोठ्या वैविध्यपूर्ण कृषी उद्योगांपैकी एक, गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेडने गोदरेज दौलत आणि गोदरेज धन लक्ष्मी ही दोन पशु आहार उत्पादने बाजारपेठेत दाखल केली आहेत.
आधुनिक संशोधन व विकासातून तयार केलेली, विविध फील्ड ट्रायल्सनंतर सादर करण्यात आलेल्या नवीन कंपाउंड फीड सोल्युशन्समुळे पशूंची उत्पादनक्षमता व पुनरुत्पादक आरोग्य सुधारण्यात मदत करणारी उत्पादने सादर करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचा नफा देखील वाढेल.
नवीन उत्पादने लॉन्च करण्यात आल्याबद्दल, गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेडचे ऍनिमल फीड बिझनेसचे सीईओ श्री. संदीप सिंग यांनी सांगितले, “कंपाउंड फीड हे केवळ खाद्य नाही तर भविष्यासाठी गुंतवणूक आहे. पशूंचे आरोग्य चांगले राहावे, दूध उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांना लाभदायक दुग्धशेती करता यावी यासाठी गोदरेज दौलत व गोदरेज धन लक्ष्मी सादर करून आम्ही शेतकऱ्यांना असा उपाय उपलब्ध करवून देऊ इच्छितो ज्यामुळे पशूंना सर्वात कमी खाद्य देऊन देखील सर्वात जास्त दुग्ध उत्पादन मिळवता येऊ शकेल.”
त्यांनी पुढे सांगितले, “योग्य कंपाउंड फीड निवडून शेतकरी महत्वपूर्ण गुंतवणूक करत आहेत, जी पुढे दीर्घ काळापर्यंत त्यांना उपयोगी ठरणार आहे. आमच्या कंपाउंड फीड सोल्युशन्सच्या मदतीने शेतकऱ्यांना पारंपरिक खाद्य प्रकारांच्या ऐवजी हे प्रगत खाद्य निवडून अतुलनीय यश मिळवता येईल.”
गोदरेज दौलत आणि गोदरेज धन लक्ष्मीमध्ये सर्व आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे असल्यामुळे संतुलित पोषण पुरवले जाते जे पशूंना दिल्या जाणाऱ्या इतर खाद्यांमधून मिळत नाही. पशूंचे एकंदरीत आरोग्य आणि पुनरुत्पादक क्षमता सुधारण्यासाठी एक लिटर दुधासाठी गायींना ३०० ग्रॅम आणि म्हैशींना ५०० ग्रॅम गोदरेज दौलत द्यावे असे सुचवण्यात आले आहे. गोदरेज धन लक्ष्मीच्या बाबतीत डोसचे प्रमाण एक लिटर दुधासाठी गायींना ४०० ग्रॅम आणि म्हैशींना ५०० ग्रॅम इतके असले पाहिजे.
गोदरेज दौलत आणि गोदरेज धन लक्ष्मी हे दोन्ही पाण्यात न भिजवता देता येतात. पण शेतकऱ्यांनी आधीच्या पशु खाद्याचे प्रमाण आठवडाभरात हळूहळू कमी करून त्याऐवजी निवडलेल्या उत्पादन द्यावे. जर शेतकरी गोदरेज धन लक्ष्मी वापरत असतील तर त्यांना आपल्या पशूंना दिवसातून दोनदा हिरवा आणि सुका चारा द्यावा लागेल आणि प्रभावी उत्पादनासाठी पिण्याचे पाणी चोवीस तास उपलब्ध करून द्यावे लागेल.
दूध उत्पादनाचा ७०% खर्च हा पशु खाद्यावर अवलंबून असतो, त्यामुळे पशूंच्या अनुवांशिक व पुनरुत्पादक क्षमतेमध्ये वाढ करण्यास मदत करणारे खाद्य वापरले गेले पाहिजे. यासाठीच गोदरेज एनिमल फीड पशूंच्या पोषणाची नवी व्याख्या रचत आहे आणि पशूंना खाद्याचे प्रत्येक ग्रामच्या ऐवजी अधिक पोषण प्रदान करून शेतकऱ्यांचे कल्याण करत आहे.