Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमावळ लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता प्रभावी अंमलबजावणी

मावळ लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता प्रभावी अंमलबजावणी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी ३३ मावळ लोकसभा मतदार संघाअंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता प्रभावीपणे राबविणेकामी मा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. दिपक सिंगला व सहा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. विठ्ठल जोशी यांचे मार्गदर्शनाखाली २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील सांगवी नाका, वाकड, काळा खडक व मुकाई चौक या चार ठिकाणी एकूण १२ स्थिर सर्व्हेक्षण पथके (SST) स्थापन करण्यात आली आहेत. सदर पथकामध्ये प्रत्येकी एक दंडाधिकारी, दोन पोलीस कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे. सदर पथके तीन पाळयांमध्ये २४ तास कार्यरत असून त्यांचेमार्फत अवैध रोकड, अंमली पदार्थ / मद्य, हत्यारे इ. बाबत प्रतिबंध करणेकामी दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे व नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात येत आहे.

 

त्याचबरोबर २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रासाठी सहा भरारी पथके (FST – Flying Surveillance Team) कार्यरत करण्यात आलेली आहेत. सदर पथकामध्ये प्रत्येकी एक दंडाधिकारी, एक पोलीस उप निरीक्षक, एक पोलीस कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे. सदर पथके तीन पाळयांमध्ये २४ तास कार्यरत असून त्यांचेसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करणेत आलेली आहे. मा. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, आचारसंहिता कक्ष, cVigil इ. द्वारे आचारसंहितेबाबत प्राप्त तक्रारींवर तात्काळ व विहीत मुदतीत कार्यवाही करण्यात येत आहे.

 

निवडणूक लढवणा-या उमेदवारांमार्फत घेण्यात येणा-या परवानगी प्राप्त प्रचार सभा, पदयात्रा, मेळावे, कोपरा सभा इ. चे प्रत्यक्ष कार्यक्रमाचे ठिकाणी चित्रीकरण करणेकामी एकूण पाच VST (Video Surveillance Team) स्थापन करण्यात आली आहेत. सदर पथकामध्ये प्रत्येकी दोन दंडाधिकारी, एक पोलीस कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांचा समावेश असून त्यांचेसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करणेत आलेली आहे.

 

VST द्वारे चित्रीकरण करण्यात आलेल्या चित्रफितीची (CD) ची पाहणी करणेकामी दोन VVT (Video Viewing Team) स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येकी चार कर्मचा-यांचा समावेश आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने करण्यात आलेली भाषणे तपासणे तसेच उमेदवारामार्फत प्रचार सभा, पदयात्रा, मेळावे, कोपरा सभा इ. दरम्यान वापरण्यात आलेले प्रचार साहित्य, वाहने, भोजन व्यवस्था व कार्यक्रमासाठी आवश्यक बाबींची आकडेवारी इ.चा अहवाल विहीत नमुन्यात मा. सहा. खर्च निरीक्षक यांना नियमीत पाठविणेत येत आहे

.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments