Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedफुले, शाहू, डॉ. आंबेडकरांचा समतेचा विचार* *देशभक्त केशवराव जेधे यांनी महाराष्ट्रात...

फुले, शाहू, डॉ. आंबेडकरांचा समतेचा विचार* *देशभक्त केशवराव जेधे यांनी महाराष्ट्रात रुजवला* *- रवींद्र धंगेकर*

 

 

फुले, शाहू, डॉ. आंबेडकरांचा समतेचा विचार देशभक्त केशवराव जेधे यांनी महाराष्ट्रात रुजवला त्यामुळेच महाराष्ट्रात सामाजिक समतेचा चळवळी होलवर रुजल्या. त्यांनी दिलेला सामाजिक समतेचा विचार आजही महत्वाचा आहे. असे विचार पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज व्यक्त केले. देशभक्त केशवराव जेधे यांचे १२८ व्या जयंतीनिमित्त पुण्यात स्वारगेट चौकात जेधे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी पुणे लोकसभा निवडणुक प्रचार प्रमुख व माजी आमदार मोहन जोशी, माजी गृह राज्मंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे, अॅड अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, रमेश अय्यर, अजय पाटील, प्रवीण करपे, गणेश नलावडे, साहिल राऊत, साहिल भिंगे, सुरेश कांबळे, अनिल पवार, रोहन पायगुडे, मंदार मते, फहीम शेख, महेश मालुसरे, दिग्वीजीय जेधे, राजवीर जेधे, राणोजी जेधे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन देशभक्त केशवराव जेधे यांचे पणतू कान्होजी दयानंद जेधे यांनी केले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments