डिजिटल युगात व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज संगणक आणि तंत्रज्ञान तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांचे मत ; ‘व्यापार क्षेत्रातील आधुनिकतेचा राजमार्ग डिजिटल मार्केटींग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावरील सेमिनार

तारां कित Avatar

पुणे : डिजिटल युगात पुण्यातील व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. दुसऱ्या व्यापाऱ्याला आपला स्पर्धक समजू नका, तुमची स्पर्धा ॲमेझॉन सोबत आहे. यासाठी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन मॉल तयार करा. जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. जितक्या लवकर डिजिटल युगातील तेवढे व्यापाऱ्यांसाठी चांगले आहे. तुळशीबाग हा ब्रँड खूप मोठा आहे. डिजिटल मार्केटिंग च्या माध्यमातून त्याला जागतिक पातळीवर पोहोचवा, असे मत संगणक तज्ञ दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.

स्टेशनरी, कटलरी अँड जनरल मर्चंटस् असोसिएशन, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन,लायन्स क्लब ऑफ शिवाजीनगर भाजपा कसबा मतदार संघ व्यापारी आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापार क्षेत्रातील आधुनिकतेचा राजमार्ग डिजिटल मार्केटींग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरील सेमिनारचे आयोजन करण्यात टिळक रस्त्यावरील नीतू मांडके सभागृहात करण्यात आले होते.

यावेळी संगणक तज्ञ डाॅ.दीपक शिकारपूर, कृत्रिम बुद्धिमत्तेचे अभ्यासक अमेय पांगारकर यांचे व्याख्यान झाले. यावेळी नितीन पंडित, सचिन जोशी, जीवन हेंद्रे, मदनसिंग रजपूत, संजय मुनोत, संजीव फडतरे, विकास पवार, चकोर सुगंध, किरण चव्हाण, राजेश शिंदे उपस्थित होते.

दीपक शिकारपूर म्हणाले, व्यापाऱ्यांनी ग्राहकांची माहिती संकलित करा. माहिती संकलन केल्याने तुम्ही व्यापारात क्रांती करू शकता. हे वैयक्तिक पातळीवर देखील व्हायला पाहिजे. आजचा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो, परंतु त्याच्या आहारी जाऊ नका. आठवड्यातील एक दिवस डिजिटल डिटॉक्स करा.

स्मार्टफोन वापरात भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सगळे काही डिजिटल होत असताना आपण त्यापासून लांब राहू शकत नाही, परंतु त्याच्या आहारी देखील जाऊ नये. तुळशीबाग आणि लक्ष्मी रोडवर व्यवहार करणे हा अनुभव असतो या गोष्टी चा आहे अनुभव ऑनलाईन मिळू शकत नाही. पारंपारिक व्यवसाय तंत्रज्ञानाने मोठा करता येतो असे त्यांनी सांगितले.

डॉ.अमेय पांगारकर म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. ए आय तंत्रज्ञान वापरण्यात भारताचा जगात दुसरा क्रमांक येतो. बेंगलोर आणि पुण्यामध्ये सर्वाधिक एआय टूल्स वापरण्यात येतात. व्यापाऱ्यांनी आपला व्यापार मोठा करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली पाहिजे.

Tagged in :

तारां कित Avatar