श्री बालाजी वाल्व कंपोनंट्सचा आयपीओ २७ डिसेंबर रोजी खुला होणार, प्राईस बँड प्रति समभाग ९५ ते १०० रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे

तारां कित Avatar

पुणे: २०११ साली सुरु करण्यात आलेली श्री बालाजी वाल्व कंपोनंट्स लिमिटेड फार्मा, ऑइल, गॅस, पॉवर आणि बांधकाम उद्योगक्षेत्राला लागणारे वाल्व कंपोनंट्स तयार करते. या कंपनीने २१.६० कोटी रुपयांच्या भांडवल उभारणीसाठी २१.६ लाख शेयर्स नव्याने जारी करून आयपीओ आणण्याचे ठरवले आहे.

बिगशेयर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे बालाजी वाल्व कंपोनंट्स आयपीओचे रजिस्ट्रार आहेत तर हेम सिक्युरिटीज लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. हेम फिनलीज हे बालाजी वाल्व कंपोनंट्सच्या आयपीओसाठी मार्केट मेकर आहेत.

आपल्या एसएमई आयपीओसाठी श्री बालाजी वाल्व कंपोनंट्स लिमिटेडने प्रति समभाग ९५ ते १०० रुपये प्राईस बँड निश्चित केला आहे. या कंपनीचे समभाग बीएसई एसएमईवर सूचिबद्ध केले जातील आणि प्रस्तावित लिस्टिंग तारीख बुधवार, ३ जानेवारी २०२४ आहे.

सोमवार, १ जानेवारी २०२४ रोजी बालाजी वाल्व कंपोनंट्स आयपीओच्या शेयर्सचे वाटप केले जाईल आणि मंगळवार, २ जानेवारी २०२४ रोजी हे शेयर्स ज्यांना वाटप केले आहे त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये जमा केले जातील. या आयपीओमध्ये क्यूआयबीसाठी नेट इश्यूच्या ५०%, रिटेल गुंतवणूकदारांसाठी ३५% आणि एनआयआय विभागासाठी नेट इश्यूच्या १५% समभागांचा समावेश असेल.

रिटेल गुंतवणूदारांनी अर्जासाठी किमान लॉट आकार १२०० समभाग असल्यामुळे किमान १.२० लाख रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. एचएनआयसाठी किमान बिडिंग आकार दोन लॉट्स किंवा २४०० शेयर्स आहे आणि एकूण २.४० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

कंपनीच्या डीआरएचपीनुसार, या आयपीओमधून जी रक्कम उभी राहील तिचा उपयोग अतिरिक्त प्लांट्स आणि मशिन्स इन्स्टॉल करण्यासाठी, खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी भांडवली खर्च करण्यासाठी वापरली जाईल.

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीच्या एकूण महसुलामध्ये उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि आशिया (भारत सोडून इतर) मध्ये निर्यातीचा हिस्सा २९% होता. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये एकूण महसूल ३९.०६ कोटी रुपये होता, जो २०२३ मध्ये ६२.९४ कोटी रुपये इतका वाढला. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आरओएनडब्ल्यू ८१.५०%, ईबीआयटीडीए १७.६०%, पीएटी मार्जिन १०.३००% तर आरओसीई २६.४७% होते.

Tagged in :

तारां कित Avatar

More Articles & Posts