Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedअमूर्त सांस्कृतिक गोष्टींचा समावेशही ऐतिहासिक वारशात शक्यः डॉ. अमिता सिन्हा जागतिक वारसा...

अमूर्त सांस्कृतिक गोष्टींचा समावेशही ऐतिहासिक वारशात शक्यः डॉ. अमिता सिन्हा जागतिक वारसा दिनी बीएनसीएतील संस्कृती अध्ययन केंद्रातर्फे भारतीय दिनदर्शिका प्रकाशित

पुणे, दि. २२ : भूतकाळात केलेली मानवी बांधकामे ही ऐतिहासिक वारसा म्हणून प्रत्यक्ष दिसू शकतील अशी मूर्त स्थळे आहेत; पण सांस्कृतिक व धार्मिक प्रतिके असणाऱ्या प्राचीन भारतीय परंपरा, देवी-देवतांवरील ऐतिहासिक, पूरातत्त्वाच्या भूमिकेतून असणाऱ्या अमूर्त गोष्टीही या वारशात येतात. गुजरातमधील पावागड डोंगर हा याच परंपरेतला आहे व त्याची गणना आता युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळात झाली आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक भूशास्त्र वास्तुकार प्रा. डॉ. अमिता सिन्हा यांनी केले. त्यांच्या हस्ते महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील संस्कृती अध्ययन केंद्रातर्फे विद्यार्थिनींनी भारतीय महिन्यानुसार तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थेच्या अकादमिक प्रमूख डॉ. शुभदा कमलापूरकर यांच्यासह केले.

 

बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या सांस्कृतिक अध्ययन केंद्राच्या प्रमूख डॉ. वैशाली लाटकर यांच्यासह सहआयोजक प्रा. यश जोशी, आणि प्रा. सिद्धी जोशी यांनी दिनदर्शिका शके १९४६ (एप्रिल २०२४ ते एप्रिल २०२५) हे टेबल कॅलेंडरच्या स्वरूपात तयार केली. ‘स्त्रीत्त्वाची शक्ती’ हा या कॅलेंडरचा विषय असून त्यामध्ये संस्कृती अध्ययन केंद्राच्या सोळा विद्यार्थिनींनी सक्रीय सहभाग घेतला. त्यापैकी अभिद्या आठवणे आणि प्रिया घरजरे प्रकाशनासाठी उपस्थित होत्या. या कॅलेंडरमध्ये दुर्गामाता, सरस्वती, महाकाली, एकविरा देवी, सिद्धीदात्री देवी, अंबिका, सप्तशृंगी, चामुंडा, काली आणि रेणुका देवी यांच्या प्रतिमांचा त्यांच्यावरील माहितीसह समावेश करण्यात आला आहे.

 

सुरुवातीला डॉ. वैशाली लाटकर यांनी जागतिक ऐतिहासिक वारसा दिनाचे महत्त्व विषद केले असून त्यांनी भारतीय संस्कृतीतील मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील ऐतिहासिक वारशाचे महत्त्व सांगितले.

 

डॉ. शुभदा कमलापूरकर यांनी या दिनदर्शिका करणाऱ्या सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक केले व केवळ भारतीय महिने सांगणारे टेबल कॅलेंडर तयार करणे ही एक अभिनव कल्पना आहे, असे त्या म्हणाल्या.

 

चंपानेर पावागड या गुजरातमधील धार्मिक व सांस्कृतिक भूप्रदेशावरील सादरीकरणात डॉ. अमिता सिन्हा यांनी भारतीय परंपरेतील देवतांचे महात्म्य व ऐतिहासिक वारसा यांचे नाते स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, भारतीय आद्य देवता या पंचमहाभुतांमध्येही वास करत असून ती परंपरा प्राचीन काळापासून पावागड सारख्या प्रदेशात पहायला मिळते. त्यामुळेच त्याचा अंतर्भाव आता जागतिक वारसा स्थळात झाला, ही अभिमानाची गोष्ट आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments