Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमानसिक आरोग्यासाठी १५ वर्षीय विद्यार्थिनीने जिंकला बिग इम्पॅक्ट २०२४ पुरस्कार

मानसिक आरोग्यासाठी १५ वर्षीय विद्यार्थिनीने जिंकला बिग इम्पॅक्ट २०२४ पुरस्कार

पुणे, २३ एप्रिल २०२४ : भारतातील आघाडीच्या रेडिओ नेटवर्कपैकी एक असलेल्या बिग एफएम तर्फे पुष्प विहार येथील अमिटी इंटरनॅशनल स्कूलची 15 वर्षीय विद्यार्थिनी समाया चौहान हिला युवकांमधील मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात सामाजिक प्रभावासाठी बिग इम्पॅक्ट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. या क्षेत्रातील तिच्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार मिळवणारी ती सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, समायाने युवकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत,ज्यामध्ये विशेषत:सोशल मीडिया ट्रोलिंग आणि ऑनलाईन बुलिंग यांचा पडणारा हानिकारक प्रभाव यांचा समावेश आहे. आपल्या विविध मोहिमांद्वारे तिने देशभरातील 50,000 हून अधिक विद्यार्थ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी मानसिक आरोग्य तज्ञांच्या मदतीने अनेक शिबिरे, प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळांचे आयोजन केले होते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments