श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सोहळा कथा सोमवारपासून निनाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजन

तारां कित Avatar

पुणे : सदाशिव पेठेतील निनाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या २१व्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सोहळा, कथा व रहस्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २५ डिसेंबर २०२३ ते २ जानेवारी २०२४ या कालावधीत दररोज सायंकाळी ५ वाजता लोकमान्य नगर मधील लोकमान्य उद्यान येथे ही भागवत कथा होणार आहे.

या भागवत कथा सोहळ्याचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते होणार आहे. निरुपणकर कृष्णदास अविनाशजी बारपांडे हे निरूपण करणार आहेत.

पुणेकरांनी मोठ्या संख्येने आपल्या लहान मुलांसह श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tagged in :

तारां कित Avatar