ऑफिस स्पेस सोल्युशन्स लिमिटेडने आपले ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मार्केट रेग्युलेटर सेबीकडे डीआरएचपी दाखल केले आहे. ३० जून २०२३ च्या आकडेवारीनुसार, ऑफिस ही भारतातील सर्वात मोठी फ्लेक्सिबल वर्कस्पेस सोल्युशन्स कंपनी आहे. सीबीआरई रिपोर्टनुसार सेंटर्सच्या एकूण संख्येच्या आधारे हे ठरवण्यात आले आहे.
कंपनीच्या आयपीओमध्ये १६०० मिलियन रुपयांपर्यंत नव्याने जारी करण्यात आलेल्या आणि विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात येत असलेल्या १,००,२३,१७२ पर्यंत समभागांचा समावेश असणार आहे.
विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये पीक एक्सव्ही पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट्स व्हीकडून ५०,११,५८६ पर्यंत, बिस्क लिमिटेडकडून ४९,३६,४१२ पर्यंत आणि लिंक इन्व्हेस्टमेंट ट्रस्टकडून ७५,१७४ पर्यंत इक्विटी समभागांचा समावेश असणार आहे.
या ऑफरमधून जे भांडवल उभारले जाईल त्याचा उपयोग नवीन सेंटर्स सुरु करण्यासाठी, खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज, एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
को-वर्किंग स्पेस म्हणून सुरु करण्यात आलेले ऑफिस हा एकात्मिक वर्कस्पेस सोल्युशन्स प्लॅटफॉर्म बनला आहे. त्यांच्या प्रमुख सेवासुविधांमध्ये फ्लेक्स वर्कस्पेसेस, कस्टमाइज्ड ऑफिस स्पेसेस आणि मोबिलिटी सोल्युशन्सचा समावेश आहे. को-वर्किंग सोल्युशन्सच्या व्यतिरिक्त ऑफिसने डिझाईन, बांधकाम, देखभाल आणि फ्लेक्सिबल वर्कस्पेस आवश्यकतांचे व्यवस्थापन यामध्ये क्षमता विकसित केल्या असून, ऑफिस ट्रान्सफॉर्म आणि ऑफिस केयरमध्ये या क्षमता दिसून येतात. ही कंपनी अनेक पूरक सेवा देखील पुरवते, यामध्ये खाद्य पदार्थ व पेये, आयटी साहाय्य आणि स्टोरेज व कस्टमायजेशनसारख्या पायाभूत सोयीसुविधा तसेच इव्हेन्ट होस्टिंग आणि मीटिंग व्यवस्था यांचा समावेश होतो.
ऑफिसकडे फ्लेक्सिबल वर्कस्पेस सोल्युशन्सची सर्वसमावेशक श्रेणी आहे, व्यक्तिगत फ्लेक्सिबल डेस्क आवश्यकतांपासून स्टार्ट-अप्स, एसएमई आणि मोठ्या कॉर्पोरेशन्ससाठी कस्टमाइज्ड ऑफिस स्पेसेसपर्यंत वेगवेगळ्या गरजा यामध्ये पूर्ण केल्या जाऊ शकतात. कंपनीच्या फ्लेक्सिबल वर्कस्पेस सोल्युशन्समध्ये सिंगल सीटपासून विविध प्रकारच्या सीट्सपर्यंत विविध सीट कोहोर्ट्सचा समावेश आहे, एक तासापासून अनेक वर्षांपर्यंत वेगवेगळ्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्टवर ग्राहक यांचा लाभ घेऊ शकतील.
फ्लेक्सिबल वर्कस्पेस विभागातील आघाडीच्या ५ कंपन्यांमध्ये या कंपनीचा क्रमांक पहिला आहे. भारतभरात १६ शहरांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. देशातील बहुतांश मायक्रो-मार्केट्समध्ये ऑफिसने स्थान मिळवले आहे. १६ शहरांमध्ये एकूण १३६ सेंटर्ससह ऑफिस एकूण ८१४३३ सीट्स पुरवते, ज्याचा चार्जेबल एरिया ४.१२ मिलियन स्क्वेयर फीट आहे. यापैकी १५ सेंटर्समध्ये १११९१ सीट्स सध्या फिट-आउटअंतर्गत आहेत, त्यांचा चार्जेबल एरिया एकूण ०.५३ मिलियन स्क्वेयर फीट आहे. (स्रोत: सीबीआरई रिपोर्ट)
मॅनेज्ड ऍग्रीगेशन या मॉडेलचे स्वरूप अधिक सहयोगात्मक आहे, यामध्ये ऑफिस स्पेस मालक फिट-आउट पायाभूत सोयीसुविधांमध्ये सह-गुंतवणूक करून सेंटरमध्ये हितधारक बनतात. विकासक किंवा स्पेस मालक फिट-आउटवर अंशतः किंवा संपूर्ण भांडवली खर्च करतात आणि काही खर्च उरलेला असेल तर ऑपरेटर करतो. हे सर्व एमए मॉडेलच्या इतर अटींवर अवलंबून असते. आधीच वाटाघाटी करून ठरवलेल्या अटींनुसार, प्रत्येक केसमध्ये जसे ठरले आहे त्यानुसार मिनिमम गॅरंटीच्या कंपोनंटसाठी निश्चित भाडे घेतले जाते आणि महसूल/नफ्यातील काही हिस्सा देखील घेतला जाऊ शकतो. बहुतांश भांडवल स्पेस मालक घालत असल्याच्या जोखमीमुळे बहुतांश एमए करार नफा किंवा महसूल शेयरिंग मॉडेलनुसार ठरवलेले असतात. गेल्या अनेक वर्षात ऑफिसने आपले लक्ष जोखीम कमी करण्यावर, ऍसेट लाईट एमए मॉडेलवर वाढवले आहे. ३० जून २०२३ च्या आकडेवारीनुसार, त्यांची ६४.९६% सेंटर्स एकूण सीट्सवर आधारित एमए मॉडेलअंतर्गत आहेत.
ऑफिसच्या प्लॅटफॉर्म अप्रोच स्ट्रॅटेजीमध्ये आधुनिक वर्कस्पेस आवश्यकतांच्या प्रमुख घटकांचा समावेश होतो, म्हणजेच क्लायंट्सना डिझाईन व बिल्ड सेवा देऊन ऑफिस ट्रान्सफॉर्मसोबत बॅकवर्ड इंटिग्रेशनमार्फत आणि स्पेस मालकांच्या वतीने फॅसिलिटी मॅनेजमेंट सेवा पुरवून ऑफिस केयरसोबत फॉरवर्ड इंटिग्रेशन करून हे केले जाते. या इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म स्ट्रॅटेजीमध्ये नेटवर्क इफेक्ट पुरवला जातो, ज्यामध्ये प्रत्येक सेगमेंट फक्त प्रायमरी क्लायंट्सना सेवा पुरवतो असे नाही तर ऑफिसच्या इतर सेगमेंट्सना देखील अनुरूप ठरतो. परिणामी, ऑफिसचे क्लायंट्स आणि स्पेस मालकांची त्यांच्या व्यापक इकोसिस्टिमसोबत ओळख करून दिली जाते, त्यामुळे क्लायंट्स टिकून राहणे वाढते आणि क्रॉस-सेलिंग संधींना चालना मिळते. ऑफिस इकोसिस्टिम ग्राहकांच्या अनोख्या गरजा पूर्ण करून अतुलनीय सेवा पुरवते. यामधील सिनर्जी ग्राहक आणि स्पेस मालकांना अखंडित अनुभव पुरवते.