(प्रतिनिधी) लघुपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढत आहे त्याचबरोबर विविध प्रकारच्या लघुपटांची निर्मिती ही वाढत आहे लघुपट निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांची संख्या लक्षात येतात लघुपट महोत्सव ही काळाची गरज बनली आहे असे मत ज्येष्ठ लेखक पत्रकार श्रीकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले
हिमाचल प्रदेश मधील मनाली येथील अटल बिहारी वाजपेयी माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या हिमाचल लघुपट महोत्सवाचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ लेखक पत्रकार श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते महोत्सवाचे पारितोषिक वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यावेळी उपस्थित होते
मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या हिमाचल लघुपट महोत्सवात रिटर्न तिकीट या लघुपटला सर्वोत्कृष्ट लघुपट पारितोषिक मिळाले तर हॅन्डबॅग या लघुपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले जुल्फी आणि क्लायमेट चेंज या लघुपटांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनासाठीचे पारितोषिक विभागून देण्यात आले
श्रीकांत कुलकर्णी म्हणाले लघुपट निर्मिती मध्ये तरुण दिग्दर्शक आणि निर्माते अधिक रज घेत आहेत त्यामुळे लघुपटांची संख्या वाढत आहे अशा लघुपटणे निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे लघुपट महोत्सवांचे आयोजन करण्यात येते या लघुकथांना तरुण दिग्दर्शक आणि निर्माते अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद देत आहेत त्यामुळे नवीन पिढीत नवीन दिग्दर्शक आणि निर्माते घडण्यास निश्चितच मदत होऊ शकेल
द कॉर्नर मॅन हा लघुपट सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट ठरला श्वेता कौशल यांना बूट स्पेस या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पारितोषिक देण्यात आले तर चेतन शर्मा यांना फास्ट या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले अक्षता बानोट यांना पिंक लिटिल सांता या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून निवड करण्यात आली
महोत्सवामध्ये हिमाचल प्रदेश सह देशाच्या विविध राज्यातील लघुपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी सहभाग घेतला दोन दिवस चाललेल्या या लघुपट महोत्सवात अण्णा सून अधिक लघुपटानचे प्रदर्शन करण्यात आले
लघुपट महोत्सव ही काळाची गरज – ज्येष्ठ लेखक श्रीकांत कुलकर्णी तिसरा हिमाचल लघुपट महोत्सव संपन्न
Share with
Tagged in :