Friday, October 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री. नितीन गडकरी भाषणातील महत्त्वाचे मुद्दे*

श्री. नितीन गडकरी भाषणातील महत्त्वाचे मुद्दे*

भारतीय जनता पक्षाचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा झाली.त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने, स्वरदा बापट, शैलेश टिळक, मंदार जोशी, रूपाली पाटील, राजेंद्र काकडे, दत्ता सागरे, वनराज आंदेकर, किरण साळी, हर्षदा फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

*नितीन गडकरी*

 

गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले

 

बापट यांनी पुण्याच्या विकासासाठी काम केले

 

टिळक यांच्या रुपाने यशस्वी महापौर मिळाला

 

बापट आणि टिळक यांची विशेषत्वाने आठवण होते.

 

पुणे मेट्रो आणि विमानतळासाठी बापट यांनी विशेष प्रयत्न केले.

 

संरक्षण मंत्रालयाकडून विमानतळासाठी जागेचा क्लिष्ट प्रश्न सोडविला.

 

 

 

पुण्याच्या रिंग रोडची अलाइनमेंट पूर्ण झाली आहे.

 

चांदणी चौक प्रकल्पामुळे वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटला.

 

रिंग रोडमुळे बाहेरच्या बाहेर रस्त्े जोडले जातील. त्यामुळे अंतर्गत पुण्यातील वाहतूक कोफ्लडी, प्रदूषण कमी होईल.

 

पुणे ते औरंगाबाद दोन तासांवर येईल.

 

पुणे ते बेंगलोर महामार्गाचे कामाचे काम निवडणुकीनंतर सुरू करणार. या सर्व रस्त्यांमुळे पुण्याच्या विकासात परिवर्तन होईल

 

पुणे अहमदनगर रस्त्यामुळे नाशिक खेड डबल डेकर इलिव्हेटेड हाय वे सहा पदरी 10 हजार कोटी मंत्रिमंडळाची मान्यता झाली की काम सुरू

 

तळेगाव ते चाकण शिक्रापूर 50 किमी दुमजली उड्डाणपूल.

 

पुणे ते शिरुर 62. 25 किमी औद्योगिकरणाला उपयुक्त 12 डेकर

 

नवीन कात्रज बोगदा रावेत एलिव्हेटेड हाय वे, किवळे चौक, पुनावळे, ताथवडे, भूमकर, नवले पूल वाहतुक कोफ्लडी सोडण्यासाठी एलेव्हिटेड कॉरिडॉर अर्ध्या तासात अंतर पार करता येईल. डीपीआर झाला आहे.

 

पश्चिम महाराष्टात 2 लाख कोटी रुपयांची विकासकामे माझ्या खात्यातून दहा वर्षांत झाली.

 

देहू आळंदी पासून पंढरपूरपर्यंत पालखी मार्ग 12 हजार कोटी जवळपास पूर्ण होईल

 

दुतर्फा झाडे लावून भक्ति मार्ग करणार

 

दहा वर्षांत राज्याला 5 लाख कोटींपेक्षा जास्त निधी दिला

 

पुणे कोल्हापूर रस्त्यासाठी निधी दिला

 

पुणे फास्टेस्ट ग्रोईंग सिटी

 

वाहतूक कोफ्लडी, प्रदूषण, वाढत्या अपघातांच्या संख्येने पुणेकर त्रस्त आहेत

 

नवीन एअरपोर्ट ही गरज आहे

 

जसा मुंबईची वाढ झाल्यानंतर नवी मुंबई शहर विकसित करण्यात आले, त्या प्रमाणे पुण्यासाठी नवीन पुणे विकसित केले पाहिजे

 

काँग्रेसच्या 60 वर्षांत प्रश्न सोडण्यापेक्षा प्रश्न गंभीर झाले

 

गेल्या दहा वर्षांत मोदींच्या नेतृत्वात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या

 

उत्तर व दक्षिणे भारतात होत असलेल्या वाहतुक सुधारणांमुळे, मुंबई पुणे आणि परिसरातील वाहतुक कोफ्लडी कमी होण्यास मदत होईल, पुणे मुंबई वाहतुक कोफ्लडी कमी होईल

 

पायाभूत सुविधांना सर्वाधिक प्राधान्य मोदींनी दिले

 

वीज, पाणी, दळणवळण साधने आहेत तिथे रोजगार वाढतो, गरीबी दूर होते

 

जगातील तिसरी अर्थव्यवस्था, पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था, निर्यात तीन पटीने वाढले

 

शेती उत्पादने निर्यात तीन पटीने वाढले

 

त्यामुळे देशाची प्रगती आणि विकास होत आहे

 

देशाला पुढे नेण्यासाठी निर्यात वाढली पाहिजे, आयात कमी केले पाहिजे

 

इलेक्ट्रिक वाहने लोकप्रिय झाली

 

ऑटोमोबाईल उद्योगामुळे प्रगती झाली

 

विमानतळ, रेल्वे, मेट्रो, डबलडेकर रस्ते यामुळे पुण्याचे जीवन सुसह्य होणार

 

पुण्यात इलेक्ट्रिक बस येणार

 

नदी सुशोभिकरण होणार

 

काँग्रेसने जे 60 वर्षांत नाही केले त्याच्या तीन पट काम भाजपने केले

 

शेतकरी, विकास व्हावा, सर्व सुखी व्हावे हा आमचा विचार

 

कम्युनिस्ट पक्ष विचारधारा संपली

 

समाजवादी संपले

 

स्वतंत्र पक्ष संपले

 

भारताच्या विकासाचा संबंध येणारे सरकार कोणत्या आर्थिक नितीवर चालणार यावर देशाचे भवितव्य ठरणार

 

आर्थिक, सामाजिक मागास, तळागाळातल दरिद्री नारायणाला परमेश्वर मानून काम करू

 

रोटी, कपडा और मकान शेवटच्या घटकाला मिळवून देणे हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे चिंतन आमच्या विचाराचा आधार आहे

 

म्हणून गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक दारिद्य्र रेषेबाहेर आले

 

पुढल्या 25 वर्षांत गरीबी राहणार नाही

 

भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल

 

जेव्हा कनव्हिन्स करता येत नाही ते कनफ्युज केले जाते

 

विरोधकांकडे कोणताही विचार नाही, कार्यक्रम नाही, त्यामुळे ते कनफ्यूज करीत आहेत

 

कोणतेही सरकार आले तरी घटनेची मूलभूत तत्व बदलता येत नाहीत

 

इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात घटनेची मोडतोड केली

 

जनता पक्षाच्या सरकारने ती पुन्हा प्रस्थापित केले

 

80 वेळा काँग्रेसने घटना बदलली

 

सांप्रदायिकता, जातीयवादाचे राजकारण काँग्रेस करत आहे

 

गरीबीला जात, धर्म नसतो, गरीबी, भूकमारी ही खरी समस्या आहे

 

जे जनतेचा विश्वास संपादन करत नाहीत ते जातीची ढाल पुढे करतात

 

समाजातील अस्पृश्यता, जातीयता दूर झाली पाहिजे शिवशाही आणि रामराज्य व्हावे ही भाजपची विचारधारा आहे

 

सेक्युलर म्हणजे सर्वधर्मसमभाव धर्मनिरपेक्षता नाही

 

हा सर्वधर्मसमभाव छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासला

 

जात, पथ, भाषा, लिंग यात कोणतेही भेद न करता आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे

 

हा देश बदलणार, स्मार्ट सिटीबरोबर स्मार्ट व्हिलेज होणार, तरुणांना रोजगार मिळणार, विज्ञान व तंत्रज्ञान, मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, साहित्य, कला, संस्कृती यांच्या सहायाने देशाला विश्वरूप करणार

 

ते करण्यासाठी योग्य निती, योग्य नेतृत्व हवे, राष्ट्राच्या पुननिर्माणासाठी तुमचे आशिर्वाद पाहिजेत

 

दहा वर्षांत मोदी सरकारचे काम हा ट्रेलर होता असली फिल्म बाकी आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एनडीए चा विजय व्हावा

 

मुरलीधर मोहोळ यांच्या सारख्या चांगल्या कार्यकर्त्याला विजयी करा

 

मोदींचे इंजिन आणि माझ्या खात्याचे इंजिन यामुळे पुण्याची राजधानी एक्सप्रेस वेगाने दिल्लीला जाईल

 

जात, धर्म, पंथ याचा विचार न करता आपल्या भवितव्याचा विचार करा

 

—

 

*मुरलीधर मोहोळ*

 

ही देशाची निवडणूक आहे. यात देशाचे भवितव्य निश्चित होणार आहे. पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आवाहन केले. लोकांचा पाठींबा मिळतो आहे. कारण दहा वर्षांचे काम, मेट्रो, ई बसेस, चांदणी चौक, नदी प्रकल्प, मेडिकल कॉलेज मोदींनी पुण्याला दिले.

 

पुण्याचे एक मत मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी द्या

 

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार आणावे

 

*चंद्रकांतदादा पाटील*

 

गिरीश बापट, मुक्ता टिळक यांचे योगदान महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करायचे आहे. देशात 30 कोटी मतदान मोदीजींना होईल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 हून अधिक जागा मिळतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments