204 मावळ विधानसभा क्षेत्रात एकूण 373,408 एवढी मतदार आहेत यामध्ये पुरुष एक लाख 42 हजार 328 व स्त्रिया एक लाख 37 हजार 462 तसेच तृतीयपंथी तेरा मतदार आहेत.
याकरिता एकूण 390 मतदान केंद्र आहेत यापैकी वाडीवले एक हे संवेदनशील मतदान केंद्र आहे व जांभळी येथील एक महिला मतदान केंद्र व वडगाव येथील एक युवा मतदान केंद्र तसेच लोणावळा येथील कॉन्व्हेंट स्कूल मधील एक आदर्श मतदान केंद्र आहे.
सर्व मतदान केंद्रांवर मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
BLO यांनी 90% पेक्षा जास्त मतदार चिठ्ठ्यांचे वाटप केले असले तरी,
प्रत्येक मतदान केंद्रावर एक बीएलओ मतदारांच्या मदतीकरिता नियुक्त करण्यात आला असून अशी एकूण 390 BLO यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचबरोबर दिनांक १२/०५/ २०२४ पासून एक सुरक्षा कर्मचारी प्रत्येक केंद्रनिहाय नियुक्त करण्यात आलेला आहे.
निवडणुकीकरिता एकूण 390 पथके असून केंद्रांवरील एकूण १८०६ राखीव सह कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
या सर्व पथकांवर व केंद्रांवर समन्वय व सहनियंत्रणाकरिता 45 सेक्टर अधिकारी यांची नेमणूक केली आहे.
दिनांक 12 /5 /2024 रोजी, सकाळी ८ वाजे पासून नूतन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे येथून 45 टेबल व सेक्टर अधिकाऱ्याद्वारे तृतीय प्रशिक्षण व मतदान साहित्य वाटप करण्यात येणार आहे .
निवडणूक साहित्य बरोबरच प्रत्येक केंद्रनिहाय प्राथमिक उपचार पेटी व ORS पाकीट वाटप करण्यात येणार आहे, त्याचबरोबर आशा सेविकांची देखील मतदान केंद्रनिहाय नेमणूक केलेली आहे, तसेच आरोग्य यंत्रणेमार्फत प्रत्येक आरोग्य केंद्रात मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.
सर्व मतदान केंद्र पदके आपापल्या केंद्रांवर त्याच दिवशी बसेस द्वारे मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत त्याकरिता 80 बसेस ची व्यवस्था करण्यात आली असून सर्व बसेसला जीपीएस व पोलीस सुरक्षा देण्यात येणार आहे.
मतदान केंद्रावर फर्निचर पाणी व इतर सुविधा पुरविण्यात आले असून सर्व नगरपालिका ग्रामपंचायत सर्कल तलाठी कोतवाल पोलीस पाटील यांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
सर्व मतदान केंद्रनिहाय पथकांवर 45 सेक्टर अधिकाऱ्याद्वारे समन्वय व सनियंत्रण करण्यात येणार आहे
त्याचबरोबर नूतन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग तळेगाव येथे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे नियंत्रण कक्षात एकूण 45 अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे हा नियंत्रण कक्ष सेक्टर अधिकारी त्यांच्या संपर्कात राहून प्रत्यक्ष मतदान केंद्रा वरील सूचना माहितीची देवाण-घेवाण करणार आहे.
त्याचबरोबर एक संगणकीय कक्ष संगणक प्रणालीमध्ये सेक्टर अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन संगणक प्रणालीत नोंदवणार आहे.
प्रत्येक सेक्टर ऑफिसर यांच्याकडे एक राखीव मतदान यंत्र असणार आहे.
तसेच एक ईव्हीएम पथक पर्यायी ईव्हीएम व तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून देणे करिता नियुक्त करण्यात आलेला आहे.
मतदानाच्या दिवशी सकाळी सर्व मतदान केंद्रनिहाय मॉक पोल पार पाडून प्रत्यक्ष सात वाजता मतदानाला सुरुवात करण्यात येणार आहे व सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे
सर्व मतदान केंद्रांवर व्हीलचेअर पाणी स्वच्छतागृह इत्यादी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध असणार आहेत
दर दोन तासांनी मतदान केंद्र अध्यक्ष सेक्टर अधिकाऱ्यांद्वारे नियंत्रण कक्षा मतदानाची आकडेवारी
मतदान केंद्राबाहेर 100 मीटर व 200 मीटर अशा हद्दी खुणा असणार आहेत,
मतदानाच्या दिवशी सर्व आठवडे बाजार बंद असणार आहेत,
अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत मावळ मुळशी यांनी दिली.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले.
204 मावळ विधानसभा मतदार संघ.
एकुण मतदार – 373408
पुरूष मतदार – 191702
स्री मतदार – 181693
तृतीयपंथी मतदार – 13
मतदान केंद्र – 390
केंद्रस्तरीय अधिकारी(BLO) – 390
मतदान अधिकारी/कर्मचारी – 1802 (राखीवसह)
सेक्टर ऑफीसर – ४५
संवेदनशील मतदान केंद्र- वाडीवले
युवा संचलित मतदान केंद्र – RK शाळा वडगाव,
महिला संचलित केंद्र – 118 जांभूळ


