Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedडायनामोज, पँथर्स, किकर्सची आगेकूच महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित...

डायनामोज, पँथर्स, किकर्सची आगेकूच महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी फुटबाॅल लीग

पुणे : दुबई एक्स्पर्ट डायनामोज, मालपाणी पँथर्स, किकर्स आणि एमजेएम ग्लॅडीएटर्स यांनी महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी फुटबॉल लीग स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल मॉलमधील फुटबॉल ग्राउंड येथे ही स्पर्धा सुरू आहे. यातील पहिल्या उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत ग्लॅडीएटर संघाने आरआर स्पार्टन्स संघावर २-१ने मात केली. यात लढतीच्या पहिल्याच मिनिटाला स्मित झंवरने गोल करून ग्लॅडीएटरला आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यांचा आनंद अधिक वेळ टिकला नाही. तिसऱ्याच मिनिटाला पार्थ सारडाने गोल करून स्पार्टन्स संघाला बरोबरी साधून दिली. यानंतर नवव्या मिनिटाला निहार झंवर याने गोल करून ग्लॅडीएटर संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखून ग्लॅडीएटर संघाने बाजी मारली.

यानंतर दुसऱ्या लढतीत किकर्स संघाने पीपी रॉयल्स संघावर ३-१ने विजय मिळवला. यात किकर्स संघाकडून श्रेष्ठ माहेश्वरीने (१५,२३ मि.) दोन, तर आकाश झंवरने (१८ मि.) एक गोल केला. रॉयल्स संघाकडून एकमेव गोल यश सिकचीने केला.

तिसऱ्या लढतीत मालपाणी पँथर्स संघाने तापडिया थंडर्स संघावर २-०ने सहज मात केली. ही लढत अगदीच एकतर्फी झाली. पँथर्स संघाकडून अर्पित मंत्री (२१ मि.) आणि श्लोक झंवर (२३ मि.) यांनी गोल केले. चौथ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत डायनामोज संघाने श्री माव्हरिक्स संघावर ३-१ ने मात केली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. डायनामोज संघाकडून अभिनंदन भुतडा (७ मि.), विभोर सोनी (१८ मि.) आणि पार्थ लाहोटी (२४ मि.) यांनी गोल केले. माव्हरिक्सच्या खेळाडूंचा बराचसा वेळ बचावातच गेला. लढतीच्या २०व्या मिनिटाला अंकित झंवरने गोल केला खरा; पण त्याचा निकालावर फारसा परिणाम झाला नाही. शेवटी ३-१ अशी आघाडी कायम राखून डायनामोज संघाने आगेकूच केली.

निकाल : ग्लॅडीएटर -२ (स्मित झंवर १ मि., निहार झंवर ८ मि.) वि. वि. स्पार्टन्स -१ (पार्थ सारडा ३ मि.).
किकर्स – ३ (श्रेष्ठ माहेश्वरी १५, २३ मि.) वि. वि. पीपी रॉयल्स ( यश सिकची ८ मि.).
मालपाणी पँथर्स – २ (अर्पित मंत्री २१ मि., श्लोक झंवर २३ मि.) वि. वि. तापडिया थंडर्स
दुबई एक्सपर्ट्स डायनामोज – ३ (अभिनंदन भुतडा ७ मि., विभोर सोनी १८ मि., पार्थ लाहोटी २४ मि.) वि. वि. श्री माव्हरिक्स – १ (अंकित झंवर २० मि.).

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments