Monday, October 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedअमेझॉन मिनीटीव्ही’तर्फेजमनापार या गुंतवून ठेवणाऱ्या ट्रेलरचे अनावरण, एखाद्याच्या मुळांशी जाणारी चित्तवेधक कथा,...

अमेझॉन मिनीटीव्ही’तर्फेजमनापार या गुंतवून ठेवणाऱ्या ट्रेलरचे अनावरण, एखाद्याच्या मुळांशी जाणारी चित्तवेधक कथा, ऋत्विक साहोर, वरुण बडोला, सृष्टी गांगुली रिंदानी आणि रघू राम यांच्या मुख्य भूमिका   जमनापार’चे विशेष स्ट्रीमिंग 24 मेपासून अमेझॉन मिनीटीव्हीवर मोफत

 

मुंबई, 17 मे 2024: – अॅमेझॉनची विनामूल्य व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा, अॅमेझॉन मिनीटीव्ही, आगामी महत्त्वाकांक्षी कलाकृती ‘जमनापार’मध्ये एका प्रेमळ कथेसह प्रेक्षकांशी बंध निर्माण करण्याण्यासाठी सज्ज आहे. स्ट्रीमिंग सेवेच्या वतीने आज मालिकेच्या अधिकृत ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. या मालिकेत शांतनु बन्सल उर्फ शँकीच्या विश्वाची झलक दिसते. पूर्व दिल्लीतील साध्या घरांपासून ते दक्षिण दिल्लीतील आकर्षक गगनचुंबी इमारतींपर्यंत, कथा शँकीच्या आयुष्याभोवती फिरते. तो आत्म-शोध आणि स्वत:च्या मुळांचा अभिमान बाळगण्याच्या प्रवासाला सुरुवात करतो. ऋत्विक साहोर, वरुण बडोला, रघु राम, सृष्टी गांगुली रिंडानी आणि अंकिता सहगल यांच्यासह प्रतिभावान कलाकारांसह, ‘जमनापार’ 24 मेपासून अमेझॉन मिनी टीव्हीवर विनामूल्य प्रसारित होईल.

 

पूर्व दिल्लीतील आपल्या संगोपनाबद्दलच्या असुरक्षिततेशी झुंज देत असलेल्या शँकीचा विश्वास असतो की जर त्याला दक्षिण दिल्लीच्या चमकत्या विश्वात नोकरी मिळाली तर त्याला यश आणि आनंद मिळेल. तथापि, तो हे पाऊल उचलत असताना, नैतिकतेचा त्याग करून कुटुंब आणि प्रगतीपेक्षा स्वतःची निवड करण्यासारख्या अडचणींना त्याला सामोरे जावे लागते! कुटुंब, मैत्री आणि स्वतःची ओळख या मूल्यांवर भर देणाऱ्या शँकीला फॉलो करा. कारण खरा आनंद केवळ एखाद्याची मुळे स्वीकारून आणि आपल्याला एकत्र बांधणाऱ्या बंधांची कदर करूनच मिळू शकतो, याची जाणीव त्याला होते.

 

अमेझॉन मिनीटीव्हीचे हेड ऑफ कंटेंट, अमोघ दुसाद म्हणाले, “जमनापार सर्व स्तरातील प्रेक्षकांना भावणारी आकर्षक आणि विचारप्रवर्तक कंटेंट सादर करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते. आजचा दिवस आणि युगाची अत्यंत पटणारी संकल्पना असलेली ही मालिका मनुष्याची मुळे, ओळख, प्रगती आणि प्रगतीशी निगडीत नातेसंबंध तसेच उदभवणारे संघर्ष यांचा परस्पर संबंध समोर आणते.”

 

या मालिकेचा भाग असणारा ऋत्विक साहोर म्हणाला, “जमनापार’मध्ये शँकी ही व्यक्तिरेखा रंगविणे म्हणजे एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी एक परिवर्तनशील अनुभव आहे. या व्यक्तिरेखेची खोल मुळं, आकांक्षांशी जुळवून घेण्याचा शँकीचा संघर्ष खोलवर गुंफलेला होता आणि त्याची कथा जिवंत करण्याची संधी मला मिळाली याचा मला अभिमान वाटतो. मला आनंद आहे की ही मालिका अमेझॉन मिनी टीव्हीवर उपलब्ध असेल आणि देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. या कलाकृतीचे मनोरंजक कथानक मनोरंजनपर असेल. शँकीच्या पात्राद्वारे, मी एखाद्याची ओळख स्वीकारण्याचे आणि कुटुंब तसेच मैत्रीचे बंध जपण्याचे महत्त्व शिकलो आहे. आमच्या प्रेक्षकांकरिता पात्राचा हा प्रवास प्रेरक ठरेल आणि ते व्यक्तिरेखेच्या मुळांमध्ये शक्ति शोधतील”.

 

“जमनापार’चा भाग होणे म्हणजे एका आनंददायक अनुभवापेक्षा कमी नाही. ओळख, कुटुंब आणि स्वप्नांचा पाठपुरावा या गुंतागुंतींचा अभ्यास करणारी ही मालिका आकर्षक आणि सखोल अशी दोन्ही प्रकारची आहे. या प्रकल्पावर काम केल्याने मला एक अभिनेता आणि एक व्यक्ती म्हणून नवीन खोली शोधण्याची संधी मिळाली. स्वतःशी प्रामाणिक असण्याचा महत्त्वाचा संदेश देताना हा कार्यक्रम प्रेक्षकांना कथनाने मंत्रमुग्ध करेल. प्रेक्षक कधी एकदा आमच्यासोबतच्या या प्रवासात सामील होतात असे झाले आहे”, असे या मालिकेत साराची भूमिका साकारणारी सृष्टी गांगुली रिंदानी म्हणाली.

 

रजत थापर ही व्यक्तिरेखा साकरणारा रघु राम म्हणाला, “जमनापार’ हे यश आणि स्वीकृतीच्या प्रयत्नात आपल्याला भेडसावणाऱ्या गुंतागुंतींचे आणि आव्हानांचे प्रतिबिंब आहे. जमनापार पाच वर्षे राहिल्यामुळे, मी केवळ कथेशीच नव्हे तर माझ्या पात्राशीही एकजीव होऊ शकलो. त्यामुळे माझ्याकरिता प्रकल्प अधिक खास आहे. या कथेचा एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो आणि या अविस्मरणीय प्रवासात प्रेक्षकांसह सहभागी होण्याची आणखी वाट मी पाहू शकत नाही.”

 

दिल्लीतील जीवनाचे प्रामाणिक चित्रण करून सामाजिक अपेक्षा मार्गी लावण्याच्या गुंतागुंतीचा शोध घेत, ‘जमनापार’ 24 मे पासून अमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, स्मार्ट टीव्ही, अमेझॉन मिनी टीव्हीवर विनामूल्य विशेष स्ट्रीम होईल किंवा प्ले स्टोअरवरून हे अॅप डाउनलोड

करता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments