मुंबई, २६ डिसेंबर २०२३: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (यूपीएसआरटीसी) टाटा एलपीओ १६१८ डिझेल बस चेसिसच्या १,३५० युनिट्सचा पुरवठा करण्यासाठी प्रतिष्ठित ऑर्डर मिळाल्याची घोषणा केली आहे. आंतरशहरीय व लांब अंतरापर्यंतच्या प्रवासासाठी विकसित करण्यात आलेली टाटा एलपीओ १६१८ बीएस-६ उत्सर्जन प्रोटोकॉल्सची खात्री देते, तसेच उच्च दर्जाची कार्यक्षमता, सर्वोत्तम पॅसेंजर कम्फर्ट देण्यासह दर्जात्मक टोटल कॉस्ट ऑफ ओनरशीप (टीसीओ) देते. सरकार निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धात्मक ई-बिडिंग प्रक्रियेनंतर टाटा मोटर्सला ही ऑर्डर मिळाली आणि बस चेसिसचा पुरवठा टप्प्याटप्प्याने करण्यात येईल.
ही ऑर्डर मिळाल्याबाबत टाटा मोटर्सच्या सीव्ही पॅसेंजर्सचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. रोहित श्रीवास्तव म्हणाले, ”सार्वजनिक परिवहन अधिक प्रभावी व कार्यक्षम बनवणे हे आमचे मिशन आहे आणि आम्ही पुन्हा एकदा बस चेसिसच्या आधुनिक ताफ्याचा पुरवठा करण्याची संधी देण्यासाठी उत्तर प्रदेश राज्य सरकार व यूपीएसआरटीसीचे आभार व्यक्त करतो. टाटा एलपीओ १६१८ प्रबळ रचना, दर्जात्मक इंजीनिअरिंग व कमी देखभालीसह प्रमाणित वेईकल आहे. ही वेईकल उच्च अपटाइम आणि कार्यसंचालनांचा सानुकूल खर्च यांसह दर्जात्मक उत्पादकता देण्यासाठी डिझाइन व निर्माण करण्यात आली आहे. आम्ही यूपीएसआरटीसीच्या मार्गदर्शनानुसार पुरवठा सुरू करण्यास उत्सुक आहोत.”
टाटा मोटर्स भारतभरातील विविध शहरांना व राज्यांना प्रगत बसेस आणि सार्वजनिक परिवहन सोल्यूशन्स वितरित करण्यामध्ये अग्रस्थानी आहे. आतापर्यंत विविध राज्य व सार्वजनिक परिवहन उपक्रमांना ५८,००० हून अधिक बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. हजारो बसेस भारतातील रस्त्यांवर यशस्वीरित्या धावत आहेत, शहरे व नगरांना दुर्गम भागांपर्यंत कनेक्ट करत आहेत आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करत आहेत.