Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedलक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दत्तजन्म उत्साहात साजरा कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ...

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दत्तजन्म उत्साहात साजरा कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे मंदिराच्या १२६ व्या वर्षी दत्त जयंती सोहळा उत्साहात

पुणे : जो जो जो जो रे गुरुवर्या, बाळा दत्तात्रया, अनुसूया माता पतिव्रता, अत्रि ऋषींची कांता, धन्य त्रिलोकी गृही असता… असे पाळण्याचे स्वर दत्तमंदिरात निनादले आणि सायंकाळी ६ वाजून ३ मिनिटांनी दत्तजन्म साेहळा उत्साहात पार पडला. पाळण्यावर पुष्पवृष्टी करून दिगंबरा, दिगंबरा…चा जयघाेष करण्यात आला.

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट तर्फे मंदिराच्या १२६व्या वर्षी आयोजित दत्त जयंती उत्सवात दत्त जन्म सोहळा मंदिरात पार पडला. प्रख्यात महिला कीर्तनकार रेशीम खेडकर यांच्या दत्तजन्माच्या कीर्तनानंतर पाळणा होऊन नेत्रदीपक आताषबाजी करून दत्तजन्म सोहळा संपन्न झाला.

दत्तजन्मानिमित्त दत्तमहाराजांच्या विलाेभनीय मूर्तीसह मंदिराला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. तसेच रंगीबेरंगी दिव्यांनी विद्युत राेषणाई देखील करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे आदी उपस्थित होते.

सकाळी दत्त महाराजांना चंदन अभिषेक व नूतन सुवर्णलिंपित आभूषणे तसेच वैजयंती मण्यांची माला परिधान करण्यात आली. तसेच उत्सव प्रमुख अक्षय हलवाई यांच्या हस्ते लघुरुद्र करण्यात आला. त्यानंतर ट्रस्टचे विश्वस्त महेंद्र पिसाळ व संगीता पिसाळ तसेच पाषाण येथील प्रसिद्ध व्यावसाईक समीर व सौ. अस्मिता भुजबळ यांच्या हस्ते श्री दत्तयाग संपन्न झाला. तसेच प्रातः आरती आमदार रवींद्र धंगेकर व प्रतिभा धंगेकर यांच्या हस्ते झाली. माध्यन्ह आरती डॉ. पी. डी. पाटील, पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ व सौ. राधिका गाडगीळ तसेच प्रविण मसालेचे राजकुमार चोरडिया यांच्या हस्ते झाली. दत्तजन्म सोहळ्यानंतर सायंकाळी पालखी नगर प्रदक्षिणा व विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले. दिवसभर श्री दत्त कलामंच उत्सव मंडपात भाविकांनी स्वहस्ते अभिषेक देखील केले.

पुणे शहराचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे शुभहस्ते सायं आरती होऊन पालखी नगर प्रदक्षिणेचा शुभारंभ करण्यात आला. बांधकाम व्यावसाईक राजुशेठ सांकला यांनी दिवसभर प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments