Thursday, August 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedसहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणेडॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ;...

सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणेडॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटनपुणे, दि.६ डिसेंबर :” सहिष्णूतेचा अर्थ म्हणजे वासनेला व क्रोधाला नियंत्रित करणे आहे. आळंदी ही ज्ञानाची भूमी आहे. हे तीर्थ क्षेत्र मानवाला विषयाच्या भवसागरातून पार करून किनार्‍यावर घेऊन जाणारे आहे. त्यामुळे येथे येणार्‍या वारकर्‍याचे अंतःकरण पवित्र बनते ”.असे विचार काशी येथील विद्वान व हिंदी सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ. योगेन्द्र मिश्रा यांनी व्यक्त केले.विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’,विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.या सोहळ्याला आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज कुर्‍हेकर, ह.भ.प. किसन महाराज साखरे यांचे चिरंजीव चिदम्बर महाराज साखरे. विठ्ठलराव काळोखे, बाळासाहेब काळोखे, अशोक उमरगेकर, सुरेश वडगावकर, शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण, देहूचे रमेश काळोखे, तुकाराम काळोखे व ह.भ.प. डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.तसेच सौ.उषा विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण व प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.डॉ. योगेन्द्र मिश्रा म्हणाले,” आळंदी ही संवेदनाची सृष्टी असल्याने येथे सत्याचे संस्कार मिळतात. आपल्यातील जिज्ञासा वृद्धिंगत होऊन समाधान मिळते. आम्हाला देवतांचे संस्कार अंगीकरण्यासाठी जिभेवरील स्वाद आणि शब्द यांचा जपून वापर करावा.”प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”सामाजिक कार्य करतांना नागरिकांचा विरोध होतच असतो. परंतू आपले लक्ष विचलित करुन नये असा सल्ला मला तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दिला होता. त्यांच्या या सूत्रानुसार आळंदी येथे घाटाची निर्मिती झाली. येथे गरूड स्तंभ ४३ दिवसांमध्ये व बद्रिनाथ येथे ६३ दिवसात माता सरस्वती मंदिराची निर्मिती झाली. विनम्रता, श्रध्दा, भक्ती आणि कर्मयोग याचेच हे फलीत आहे.”अशोक उमरगेकर म्हणाले,” आळंदी साठी राजकीय क्षेत्र व महाराष्ट्र सरकारला जे काम करता आले नाही ते काम डॉ. कराड यांनी केले. त्यांनी शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक क्षेत्रात अतुलनिय कार्य केले आहे. सर्वप्रथम वारकर्‍यांनासाठी शौचालयांची निर्मिती केल्यानंतर त्यांनी घाट व गरुड स्तंभ उभा केला.”चिदंबर महाराज साखरे म्हणाले.” सहिष्णूता ही व्यापक असून त्यात विश्व चिंतनाचा समावेश आहे. त्यामुळे सर्व तीर्थ क्षेत्र हे ज्ञान तीर्थ क्षेत्र व्हावे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ज्ञान पोहचविण्यासाठी कार्य करावं. आपल्या मनाचा तोल सांभाळण्याचे कार्य संत वाग्ड़मय करतात त्यामुळे त्यांचे वाचन करावे.”प्रा.स्वाती कराड चाटे म्हणाल्या, “भारतीय शिक्षण पद्धतीत अध्यात्माचा समन्वय व्हावा या साठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु डॉ. कराड यांनी ४०वर्षापूर्वीच हा प्रयोग केला आहे. तीर्थ क्षेत्रापासून ज्ञान तीर्थ क्षेत्रापर्यंतचा हा प्रवास अद्भूत आहे.”डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,” ७०० वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर यांनी विश्वात्मक कल्पना मांडून जाती पातीमध्ये दुभांगलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला होता. आळंदीची भूमी जगाच्या इतिहासात मानवाचे गुरूकुल बनले आहे. वारी म्हणजे मानवाच्या चित्त शुद्धीचा आध्यत्मिक महोत्सव आहे.”डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, ” हा मंच ज्ञानाची दिवाळी साजरा करण्यासाठी आहे. डॉ. कराड व ह.भ.प. साखरे महाराज यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला कळण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. इंद्रायणीच्या दोन्हीं किनार्‍यावर शिक्षण घेणार्‍या वारकर्‍यांची संख्या वाढावी. तसेच देशातील सर्व नद्यांच्या किनार्‍यावर शिक्षणाची ज्ञान केंद्रे बनावीत.”त्यानंतर पं.वसन्तराव गाडगीळ व विठ्ठलराव काळोखे यांनी आपले विचार मांडले.डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी प्रस्तावना केली व नंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.ह.भ.प. शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

Previous article
सशस्त्र सेना ध्वज दिनी जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे अनोखी मानवंदना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट चा उपक्रम ; तब्बल ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग पुणे : भारत माता की जय च्या जयघोषात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साज-या करण्यात येणा-या सशस्त्र सेना ध्वज दिनी अनोखी मानवंदना देण्यात आली. भारताचा राष्ट्रध्वज तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या ध्वजांची भव्य प्रतिकृती न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट तर्फे साकारण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन भारतात दरवर्षी ७ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. देशाच्या सीमांचे रक्षण तीन सैन्य करतात. भारतीय लष्कर ध्वज दिन प्रत्यक्षात लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजरा केला जातो.अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, सशस्त्र सेना ध्वज दिवस हा भारतीय सशस्त्र दलातील जवानांच्या कल्याणासाठी भारतातील लोकांकडून निधी गोळा करण्यासाठी समर्पित करण्यात आलेला दिवस आहे. हा दिवस भारताच्या प्रत्येक सैनिकाचा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. त्यामुळे यादिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सैनिकांना अनोखी मानवंदना दिली आहे. * फोटो ओळ – न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट तर्फे सशस्त्र सेना ध्वज दिनी अनोखी मानवंदना देण्यात आली. भारताचा राष्ट्रध्वज तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या ध्वजांची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती.
Next article
योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळाश्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दिनी सोमवार दि.११ डिसेंबर २०२३ रोजीशुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ : भालेराव, देवगावकर, शहरकर, कुंभार यांना यंदाचा पुरस्कारपुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाअंतर्गत योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, दिनांक ११ डिसेंबर सायंकाळी ५ वाजता सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती वेद विद्या संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला अध्यक्ष विलास देशपांडे, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, कोषाध्यक्ष दिलीप संभूस, वेदमूर्ती आहिताग्नी सुधाकरपंत कुलकर्णी, डॉ. संजय देवडीकर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे वैदिक संशोधन मंडळ पुणे चे संचालक सुब्रह्मण्यम वेरीवेंटी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेदाचार्य शांतारामजी भानोसे, नाशिक हे उपस्थित राहणार आहेत. निखिल भालेराव यांना योगीश्वर याज्ञवल्क्य पुरस्कार ( १५०००/- व मानपत्र), वेदांग शहरकर यांना आदर्श छात्र पुरस्कार, ( ११०००/- व मानपत्र), श्रीमती रत्नमाला गजानन जोशी स्मरणार्थ सेवारत्न पुरस्कार (१००००/- व मानपत्र) अरुण देवगावकर यांना देऊन ह.भ. प. बाळू कुंभार यांना ज्ञानेश्वरी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.याशिवाय अथर्व हरदास, कौस्तुभ पाठक, प्रशांत जोशी, चिन्मय जोशी, अभय जोशी यांना छात्र पुरस्कार(प्रत्येकी २५००/-) प्रदान करण्यात येणार आहेत. या शिवाय दिनांक २२जानेवारी २४ रोजी अयोध्येत पुण्यातून रामजन्मभूमी स्थळी पूजेसाठी जाणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असून १०वी १२वी व इतर परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व शिष्यवृत्तीचे चेक वाटप होणार आहे.तरी सर्व पुणेकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments