31 मे 2024: विबग्योर ग्रुप ऑफ स्कूलला नुकत्याच झालेल्या सीआयएससीई (कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन), आयएससी (इंडियन स्कूल सर्टिफिकेट), आणि सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन) बोर्ड परीक्षांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट निकाल जाहीर करताना अभिमान वाटत आहे. विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी शैक्षणिक उत्कृष्टता आणि सर्वांगीण शिक्षणाप्रती असलेली विबग्योरची बांधिलकी अधोरेखित करते.
यावर्षी, विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्समधील विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, जे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वसमावेशक विकासाच्या संधींबद्दल संस्थेची बांधिलकी दर्शवते. विबग्योरच्या विद्यार्थ्यांनी एक उल्लेखनीय मानक स्थापित केले आहे, त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये उच्च श्रेणी आणि उच्च गुण प्राप्त केले आहेत. विबग्योर स्कूलच्या सर्वांगीण शैक्षणिक वातावरणामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी विविध विषयात प्रावीण्य मिळवले आहे.
विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्समधील टॉपर्स:
विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्समधील सीआयएससीई ग्रेड 10 टॉपर्सः
यशवी बगरेचा – 99.00%, विबग्योर हायस्कूल – गोरेगाव, मुंबई
अविशी तपारिया – 99.33%, विबग्योर हायस्कूल – मलाड ईस्ट, मुंबई
चैतन्य सोनी – 99.00%, विबग्योर हायस्कूल – मलाड ईस्ट, मुंबई
आयुष चौधरी – 99.00%, विबग्योर हायस्कूल – मलाड ईस्ट, मुंबई
आर्यन गांधी – 98.17%, विबग्योर हायस्कूल – गोरेगाव, मुंबई
विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्समधील आयएससी ग्रेड 12 टॉपर्स:
अवनीर रक्षित – 97.50% (विज्ञान) – विबग्योर हायस्कूल – एनआयबीएम, पुणे
सौजस जैन – 95.75% (विज्ञान) – विबग्योर हायस्कूल – एनआयबीएम, पुणे
सहस्र वुस्थेला – 95% – (वाणिज्य) – विबग्योर हायस्कूल – मराठाहल्ली, बेंगळुरू
अविक्षित कुमार – 95.50% (विज्ञान) – विबग्योर हायस्कूल – एनआयबीएम, पुणे
सीबीएसई ग्रेड 10 टॉपर्स:
प्रांशु गुप्ता – 99.20% विबग्योर हायस्कूल – वडोदरा, गुजरात
आर्य साईबन्नवर – 99.00% विबग्योर हायस्कूल – कोल्हापूर
चिन्मय सुर्यवंशी – 98.80% विबग्योर हायस्कूल – कोल्हापूर
सीबीएसई ग्रेड 12 टॉपर्स:
कुणाल अय्यर – 97.20% (वाणिज्य)- हायस्कूल – वडोदरा, गुजरात
गार्गी दिनेश चमोली – 96.40% (वाणिज्य)- हायस्कूल – वडोदरा, गुजरात
टिक्यानी याशिता – 96.20% (वाणिज्य)- हायस्कूल – वडोदरा, गुजरात
हे उत्कृष्ट निकाल विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण, त्यांच्या पालकांचा पाठिंबा आणि विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्समधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांचा पुरावा आहे.
कविता केरवाला, वाइस-चेयरपर्सन विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्स, म्हणाल्या, “आमच्या विद्यार्थ्यांनी सीआयएससीई, आयएससी आणि सीबीएसई बोर्ड परीक्षांमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो. त्यांचे यश हे त्यांच्या परिश्रम, चिकाटी आणि विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्समध्ये दिलेले उच्च दर्जाचे शिक्षण यांचे प्रतिबिंब आहे. कठोर शैक्षणिक प्रशिक्षणासह, सर्वांगीण विकासावर आमचे लक्ष केंद्रित आहे, ज्याने आमच्या विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर विविध अभ्यासक्रम उपक्रमांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम केले आहे. उत्कृष्टतेची ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक बाबतीत भविष्यासाठी तयार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्स सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वर्षांत उत्कृष्टतेचा हा वारसा पुढे चालू ठेवण्याची अपेक्षा करतो.


