Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedईझीआरएक्‍सचा पाथ आणि आरोग्‍य विभाग, सातारा जिल्‍हा परिषद यांच्‍यासोबत धोरणात्‍मक सहयोग

ईझीआरएक्‍सचा पाथ आणि आरोग्‍य विभाग, सातारा जिल्‍हा परिषद यांच्‍यासोबत धोरणात्‍मक सहयोग

पुणे, २४ मे २०२४ : नॉन-इन्‍व्‍हेसिव्‍ह डायग्‍नोस्टिक सोल्‍यूशन्‍समधील आघाडीची नवप्रवर्तक कंपनी असलेल्या ईझीआरक्‍स ने ना-नफा तत्त्वावर आधारित संस्‍था पाथ आणि आरोग्‍य विभाग, सातारा जिल्‍हा परिषद यांच्‍यासोबत सहयोग केला आहे. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक आव्हानांना सामोरे जाण्यावर विशेष भर देऊन प्राथमिक आरोग्य सेवांना चालना देऊन आयुष्मान भारत कार्यक्रमाला बळकट करण्याचे या धोरणात्मक सहयोगाचे उद्दिष्ट आहे. या सहयोगाचा हेतू या भागातील महिलांमध्‍ये सक्रिय आरोग्‍यसेवेला प्राधान्‍य देण्‍याबाबत जागरूकता निर्माण करणे आहे. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून, ईझीआरक्‍स ने साताऱ्यातील आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी आपली चार नाविन्यपूर्ण ईझी चेक उपकरणे उपलब्ध केली आहेत.

कंपनीने सातारा जिल्‍ह्यामधील सामुदायिक आरोग्‍य अधिकाऱ्यांसाठी २ मे रोजी सर्वसमावेशक प्रशिक्षण सत्राचे देखील आयोजन केले. या सत्रांना अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सुनिल चव्‍हाण, जिल्‍हा फार्मसी प्रमुख श्रीमती अपर्णा भिडे, सातारा जिल्‍हा हॉस्पिटलचे निवासी वैद्यकीय अधिकारी विकास नामदेव वाडगये आणि पाथ व आरोग्‍य विभाग, सातारा जिल्‍हा परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. ईझीचेक प्रभावीपणे ऑपरेट करता येण्‍यासाठी आरोग्‍यसेवा व्‍यावसायिकांना आवश्‍यक कौशल्‍यांसह सुसज्‍ज करण्‍याकरिता प्रशिक्षण सत्र डिझाइन करण्‍यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments