Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedशाश्वतता दृढ करण्यासाठी - होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त...

शाश्वतता दृढ करण्यासाठी – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन देशभरात १ लाख झाडांचे वितरण आणि रोपण करणार

डेहराडून, ५ जून २०२४ – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) ५ जून रोजी असलेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हा संपूर्ण महिना पर्यावरणाशी संबंधित उपक्रम साजरे करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याची सुरुवात सफोसा होंडा, डेहराडून (उत्तराखंड) येथे वृक्षारोपण समारंभाने करण्यात आली. यावेळी योगेश माथुर, (संचालक, विक्री आणि विपणन), श्री. तदाशी मिशिगे (कार्यकारी समन्वयक, ग्राहक सेवा) श्री. शिपप्रकाश हिरेमठ (ऑपरेटिंग अधिकारी, ग्राहक सेवा) त्याचप्रमाणे एचएमएसआयचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पर्यावरण महिना साजरा करताना एचएमएसआय देशाच्या विविध भागांत १ लाख झाडे लावून प्रेरणादायी आदर्श घालून देत आहे.

एचएमएसआयचे अथोराइड् मेन डीलर्स (एएमडी) मोपत पीयूसी तपासणी, ग्राहकांना माहितीपत्रकांचे वाटप, इन्व्हॉइसेस आणि वाहनांसाठी पर्यावरण जागरूकतेचा प्रसार करणाऱ्या स्टिकर्सचे वाटप अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करून या अभियानात सहभागी होणार आहेत. त्याशिवाय एचएमएसआय वितरक जून महिन्यात डीलरशीपला भेट देणाऱ्या सर्व ग्राहकांना झाडे भेट देणार आहेत.

युनायटेड नेशन्स एन्व्हॉरन्मेंट प्रोग्रॅमद्वारे ५ जून रोजी साजरा केला जाणारा जागतिक पर्यावरण दिन हा एक वार्षिक उपक्रम असून तो पर्यावरण संर्वधनासाठी सकारात्मक कृती करण्यासाठी प्रेरणा देणारा, जगभरात साजरा केला जाणारा दिवस ठरावा असे ध्येय आहे. २०५० पर्यंत कार्बन न्युट्रिलिटीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एचएमएसआय बांधील असून ते पर्यावरण दिनाच्या यंदाच्या ‘जमिनीचे पुनरूज्जीवन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधकता’ या मध्यवर्ती संकल्पनेशी सुसंगत आहे. कंपनी आपल्या दैनंदिन कामाकाजात जमिनीचे पुनरूज्जीवन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधकता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी जमिनीचे शाश्वत व्यवस्थापन, माती आणि जल संवर्धन, पुनरूज्जीवन आणि वनीकरण, समाजाता सहभाग आणि शिक्षण, धोरण आणि प्रशासन अशाप्रकारचे उपक्रम राबवत आहे.

एचएमएसआय आपल्या कामकाजाच्या प्रत्येक पातळीवर पर्यावरण जपण्यासाठी काम करत आहे. उत्सर्जन कमी करणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यापासून हरित उत्पादनात गुंतवणूक करण्यापर्यंत विविध ठिकाणी एचएमएसआय शाश्वत भविष्यासाठी योगदान देत आहे. एचएमएसआयचा नरसापूर (बेंगळुरू) येथील तिसरा कारखाना आपली ९८ टक्के विजेची गरज अक्षय उर्जेतून पूर्ण करतो. एचएमएसआय आपल्या उर्जाविषयक एकूण गरजांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त गरज अक्षय उर्जा स्त्रोतांतून भागवत आहे. एचएमएसआयच्या सर्व कारखान्यांना प्रतिष्ठित ग्रीनको वर्ल्ड क्लास रेटिंग देण्यात आले असून कंपनीने साध्य केलेला प्लॅटिनम आणि प्लॅटिनम प्लस स्तर पर्यावरणाप्रती बांधिलकी दर्शवणारा आहे. जल संवर्धन क्षेत्रातील बांधिलकी दर्शवण्यासाठी एचएमएसआयद्वारे सर्व उत्पादन केद्रांत सांडपाणी सोडण्याचे प्रमाण शून्य आहे. कंपनीने नरसापूर (बेंगळुरू) येथे तिसरे उत्पादन केंद्र सुरू केले असून येथील पाण्याची १०० टक्के गरज पावसाच्या पाण्याद्वारे भागवली केली जाते.

जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्याचे ठळक प्रयत्नही केले जात असून कंपनीच्या सर्व कारखान्यांत सौर उर्जेवर चालणारे वॉटर हीटर्स वापरले जातात. पर्यावरणपूरक पद्धतींता अवलंब आणि पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी जपण्याच्या संस्कृतीला चालना देत एचएमएसआय नाविन्यपूर्ण वाहतूक सुविधा उपलब्ध करून देत पर्यावरणीय शाश्वतता जपत आहे.

एचएमएसआय सर्वांना हरित चळवळीत सहभागी होऊन पर्यावरणावर सकारात्मक परिणाम घडवण्याचे आवाहन करत आहे. एकत्रितपणे

आपण पुढच्या पिढ्यांसाठी अधिक हरित, निरोगी पृथ्वी निर्माण करूया.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments