Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवविकासामध्ये अर्थशास्त्र,समता,नैतिकता आणि पर्यावरणाचा समतोल आवश्यक - डॉ.माशेलकर *...

नवविकासामध्ये अर्थशास्त्र,समता,नैतिकता आणि पर्यावरणाचा समतोल आवश्यक – डॉ.माशेलकर * जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पीआयसी तर्फे सस्टेनेबल ॲन्ड क्लायमेट रेझिलियंट डेव्हलपमेंट फॉर इंडिया पुस्तकाचे प्रकाशन

पुणे,6 जून 2024 : नवविकासामध्ये अर्थशास्त्र,समता,नैतिकता आणि पर्यावरणाचा समतोल आवश्यक आहे, असे मत जेष्ठ शास्त्रज्ञ आणि पीआयसीचे अध्यक्ष डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) तर्फे प्रसिध्द शास्त्रज्ञ,पीआयसीचे विश्वस्त व पीआयसीच्या एनर्जी एनव्हायरमेंट ॲन्ड क्लायमेट चेंज (ईईसीसी) संशोधन विभागाचे प्रमुख प्रा.अमितव मल्लिक यांनी संपादित केलेल्या सस्टेनेबल ॲन्ड क्लायमेट रेझिलियंट डेव्हलपमेंट फॉर इंडिया या पीआयसीच्या पहिल्या स्वयंप्रकाशित पुस्तकाचे प्रकाशन सुमंत मुळगावकर हॉल येथे करण्यात आले.

पीआयसीचे अध्यक्ष डॉ.रघुनाथ माशेलकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स ॲन्ड इकोनॉमिक्सचे कुलगुरू डॉ.अजित रानडे, पीआयसीचे संचालक अभय वैद्य उपस्थित होते. या पुस्तकामध्ये नऊ लेखक व शाश्वतता तज्ञ यांचा सहभाग असून यामध्ये डॉ.प्रियदर्शिनी कर्वे,डॉ.गुरूदास नूलकर,डॉ.नितांत मते,मेघा फडके, शाल्वी पवार,आदिती काळे,डॉ.एजाज घनी,अजय शंकर व प्रा.अमितव मल्लिक यांचा समावेश आहे.

डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी दिल्ली येथे 50 डिग्रीपर्यंत वाढलेल्या तापमानाकडे लक्ष वेधले आणि म्हणाले की,वाढलेले तापमान,उष्णतेच्या लाटा,पाण्याची टंचाई या माध्यमातून आपण हवामान बदलाचे परिणाम अनुभवत आहोत. मनुष्यकेंद्रित विकासासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. नवविकासामध्ये अर्थशास्त्र,समता,नैतिकता आणि पर्यावरणाचा समतोल आवश्यक आहे.

डॉ.अजित रानडे ते म्हणाले की,शाश्वत विकासामध्ये नैतिकता आणि पुढील पिढीचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

दोन वर्षांपूर्वी पीआयसीच्या ईईसीसी विभागातर्फे हवामान सुरक्षित भविष्यासाठी तरूणांचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला होता.याकडे लक्ष वेधत प्रा.मल्लिक म्हणाले की,हवामान बदलाबाबत जागरूकता वाढली आहे,मात्र आता ठोस कृती करण्याची वेळ आली आहे आणि यासाठी स्वच्छ अक्षय्य ऊर्जा महत्त्वाची ठरेल. फक्त जीडीपीच्या मागे न धावता ग्रीन जीडीपी विकसित करण्यावर आपण भर देण्याची वेळ आली आहे.

पुस्तक प्रकाशनानंतर लेखकांचा सहभाग असलेले चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पीआयसीमधील संशोधन सहाय्यक सानिका पोतनीस यांनी केले तर,अभय वैद्य यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments