जून 6, २०२४: टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. (टीपीईएम) या टाटा मोटर्स लि.ची उपकंपनी आणि भारतातील इलेक्ट्रिक वेईकल (ईव्ही) क्रांतीमधील अग्रणी कंपनीने ईव्हीसंदर्भातील मिथकांना दूर करणारी मोहिम # ईझीटुईव्ही लाँच केली. ही मोहिम ग्राहकांना जागरूक करण्यासाठी आणि ईव्हींसंदर्भातील मिथकांना दूर करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामुळे फेंस सिटर्स आणि संभाव्य ग्राहकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. ही मोहिम प्लॅटफॉर्म्सवर लाँच करण्यात आली आणि अधिकाधिक ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी टाटा आयपीएल २०२४ दरम्यान देखील प्रचार करण्यात आली.
ही मोहिम गेल्या वर्षी टाटा आयपीएल २०२३ दरम्यान लाँच करण्यात आलेल्या टाटा. ईव्हीच्या व्हिडिओजच्या ‘गो. ईव्ही’ सिरीजचे विस्तारीकरण आहे, जी ईव्हीचा अवलंब करण्यासंदर्भात विविध कारणांचे निराकरण करते. भारतातील ईव्ही ग्राहकांच्या भावी पिढीला सक्षम करण्याचा मनसुबा असलेली यंदाची # ईझीटुईव्ही मोहिम संबंधित, हलक्या-फुलक्या शब्दचित्रांच्या सिरीजच्या माध्यमातून प्रमुख अडथळ्यांचे निराकरण करते, ज्यामधून अधिक प्रभाव व प्रचाराची खात्री मिळते. नाविन्यतेप्रती कटिबद्ध आणि शाश्वत भविष्य संपादित करण्याच्या प्रयत्नासह या मोहिमेने ईव्ही अवलंबतेबाबत सतत चर्चांना चालना दिली आहे.
लहान, पण साध्या कथानकाच्या माध्यमातून सिरीजमधील व्हिडिओज ईव्हींशी संबंधित मुलभूत मिथकांना दूर करते. ही सिरीज ईव्ही लांबच्या प्रवासासाठी परिपूर्ण सोबती असल्याचे दाखवत सुरू होते, ज्यामुळे रेंजबाबतची चिंता दूर होते आणि विविध व्हिडिओजच्या माध्यमातून पुढील सारख्या मिथकांचे निराकरण करण्यात आले आहे.
मिथक
निराकरण
ईव्ही चार्जिंग करण्यासाठी खूप वेळ लागतो.
फक्त २० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये Tata.ev १०० किमीची रेंज देऊ शकते.
ईव्हीची बॅटरी तिच्या वॉरंटीपर्यंतच टिकून राहते.
ईव्हीची बॅटरी स्मार्टफोन किंवा टॅब्लेट यांसारख्या इतर कोणत्याही ग्राहक इलेक्ट्रॉनिक डिवाईसप्रमाणे तिच्या वॉरंटीपेक्षा अधिक काळ टिकून राहते.
ईव्ही खरेदी करण्यासह देखरेख ठेवण्यास खर्चिक आहे.
ईव्हीमधील कमी पार्टसमुळे देखरेखसाठी कमी खर्च होतो.
ईव्ही खरेदी करण्यास महाग आहेत.
ईव्ही पेट्रोल-संचालित वाहनांच्या तुलनेत ५ वर्षांमध्ये ४.२ लाख रूपयांहून अधिक बचत करते.
बऱ्याच लोकांकडे ईव्ही नाही.
रस्त्यावर १.५ लाखाहून अधिक Tata.evs धावत आहेत आणि आकडेवारी वाढत आहे.
भारतात फारसे चार्जिंग स्टेशन्स नाहीत.
भारतात सध्या १२,००० हून अधिक सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स आहेत.
पावसामध्ये ईव्ही चालवणे धोकादायक आहे.
ईव्हीची मोटर व बॅटरी आयपी६७ प्रमाणित आहे, तसेच जलरोधक व धूळरोधक आहे.
ईव्ही चार्जिंग करणे सहजसाध्य नाही.
ईव्ही चार्जिंग करणे विनासायास आहे आणि घरामध्ये सहजपणे चार्ज करता येऊ शकते.
टाटा. ईव्हीचे मुलभूत आधारस्तंभ समुदाय, तंत्रज्ञान व शाश्वततेशी बांधील राहत ही मोहिम ईव्हींचे लोकशाहीकरण करण्याप्रती कंपनीच्या कटिबद्धतेला सादर करते. फेंस-सिटर्स आणि निंदा करणाऱ्यांशी परस्परसंवाद साधत व संलग्न होत # ईझीटुईव्ही मोहिम ‘लाइफ इज ईजी विथ अॅन ईव्ही’ कसे आहे हे दाखवून देते.
तसेच, ही मोहिम संभाव्य ग्राहकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत भारतात टाटा. ईव्हीसाठी विकासाच्या पुढील टप्प्याला देखील चालना देत आहे. मेट्रो शहरांपासून उदयोन्मुख बाजारपेठांपर्यंत ईव्ही विभागात मोठी वाढ दिसून येत आहे, जेथे आर्थिक वर्ष २४ मध्ये वार्षिक ९० टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा देशामध्ये ईव्हींचा अवलंब वाढवण्याच्या भारताच्या शाश्वत गतीशीलता प्रवासामधील या संधीचा फायदा घेण्याचा मनसुबा आहे.


