Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेवळ प्रसूती देखभाल नव्हे तर समुदायाच्या कल्याणासाठी मॉमस्टोरी बाय सह्याद्रि हॉस्पिटल्सतर्फे राबवले...

केवळ प्रसूती देखभाल नव्हे तर समुदायाच्या कल्याणासाठी मॉमस्टोरी बाय सह्याद्रि हॉस्पिटल्सतर्फे राबवले जात आहेत विविध उपक्रम प्रसूतीनंतरच्या पोषणाला प्रोत्साहन देण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल्सचा अंगणवाडी व आशा सेविकांसोबत सहयोग मॉमस्टोरीच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त स्थानिक अनाथाश्रमांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम व भेटवस्तू वाटपाचे आयोजन

पुणे, ०७ जून २०२४: सह्याद्रि हॉस्पिटल्सने मॉमस्टोरीच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्ताने नुकतेच मॉमस्टोरी प्रेग्नन्सी कार्निवलचे आयोजन केले होते. यामध्ये हॉस्पिटलने गरोदर मातांचा सन्मान केला. इतकेच नव्हे तर, पुण्यामध्ये आपले प्रभावी समुदाय पाठिंबा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे यावेळी ठळकपणे अधोरेखित केले. सेलिब्रेटी बिपाशा बासू यावेळी उपस्थित होत्या, तसेच अनेक गरोदर माता-पिता यामध्ये सहभागी झाले होते. हॉस्पिटलच्या उपक्रमांमध्ये समुदायाचा सहभाग किती मोठा आहे हे यावेळी दिसून आले.

यंदाच्या कार्निवलमध्ये मॉमस्टोरीने गरोदर महिलांसाठी आवश्यक असलेल्या आहाराकडे लक्ष देण्याचे महत्त्व मांडले. गरोदर असताना आणि प्रसूतीनंतर माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी सकस आहार खूप महत्त्वाचा असतो. गरोदर मातेच्या आहार आणि पोषणाचा थेट परिणाम गर्भाच्या वाढीवर आणि जन्मानंतर बाळाच्या विकासावर होतो. ग्रामीण आणि दुर्गम भागांमधील महिलांना योग्य पोषण व गुणवत्तापूर्ण आहार उपलब्ध नसतो, त्यामुळे माता व बाळ या दोघांच्याही आरोग्यामध्ये अनेक कमतरता निर्माण होतात.

कार्निवलमध्ये उपस्थितांना उपयुक्त माहिती, उत्साह आणि समुदाय सहभाग यांचा अनुभव घेता आला. सेलिब्रेटी बिपाशा बासू यांनी पालकत्वाचे आपले अनुभव सर्वांसोबत शेयर केले, सहभागी झालेल्यांसोबत संवाद साधला आणि या आनंदसोहळ्याला व्यक्तिगत कार्यक्रमाचे स्वरूप मिळाले. सह्याद्रि हॉस्पिटल्समधील मॅटर्नल चाईल्ड कोच, डॉ महिमा बक्षी यांनी मातृत्व कल्याणाप्रती हॉस्पिटलची निष्ठा अधोरेखित करताना सांगितले, “मातृत्वाच्या सुरुवातीपासूनच आरोग्य आणि आनंदी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी मॉमस्टोरी बांधील आहे. आजचा हा आनंदसोहळा एक मंच आहे, जिथे आम्ही नवीन सीएसआर उपक्रमांना प्रोत्साहन देत आहोत, गरोदर महिलांच्या आहार गरजांवर लक्ष केंद्रित करत आहोत कारण माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे.”

नवकरण सिंग कांग, सह्याद्रि हॉस्पिटल्स आणि मॉमस्टोरीचे सहाय्यक उपाध्यक्ष यांनी या उपक्रमांची तपशीलवार माहिती देताना सांगितले, “प्रसूतीनंतर तब्येत पूर्ववत होण्यासाठी आणि स्तनपानातून मिळणाऱ्या पोषणामध्ये सुधारणा करण्यात उपयुक्त ठरणारे पोषक लाडू पुरवण्यासाठी स्थानिक अंगणवाडी व आशा सेविकांसोबत हातमिळवणी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही माहेर अनाथाश्रमला भेट दिली, आमच्यासाठी हा खूप समाधानाचा क्षण होता. याठिकाणी आम्ही मुलांसोबत खेळ खेळत इतर मजेदार उपक्रम केले, खाऊचे पुडे, मिठाई आणि भेटवस्तू वाटल्या. हा संपूर्ण दिवस खूप आनंदात गेला आणि समुदायांसोबत सार्थक संवाद साधला गेला. पुण्यातील हडपसर पट्ट्यातील इंदापूर आणि सोलापूर ट्रॅकवर पुढील 6 महिन्यांत 2000 आशा कार्यकर्त्यांना आणि अंदाजे 3000-4500 गर्भवती आणि नवजात मातांना लाभ मिळवून देण्याचे आमच्या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.”.

या कार्निवलमध्ये झुम्बा सेशन, मॅटर्निटी फोटो बूथ, फॅशनेबल व स्टायलिश फन प्रॉप्स व झोन यांचा देखील समावेश होता. यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांसाठी दिवस मनोरंजक व माहितीपूर्ण ठरला. लकी ड्रॉ व स्पेशल गिव्हअवेमुळे वातावरणातील उत्साह वाढला.

बिपाशा बासू यांनी या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला, त्या म्हणाल्या, “इतक्या सगळ्या प्रेरणादायी मातांसोबत हा विशेष दिवस साजरा करायला मिळाला हे मी माझे भाग्य समजते. याठिकाणी शेयर करण्यात आलेली प्रत्येक कहाणी मातृत्वामधील ताकद आणि आनंद दर्शवते. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मातांना पाठिंबा पुरवला जाईल, त्या सक्षम होतील हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”

मॉमस्टोरी प्रेग्नन्सी कार्निवलमध्ये सह्याद्रि हॉस्पिटल्सने मातृत्वाचा सन्मान केला, इतकेच नव्हे तर, समुदायाला पोषण पुरवण्याप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली, मातृत्वाच्या संपूर्ण प्रवासामध्ये पुरेपूर काळजी व आपलेपणा पुरवला जाईल हे सुनिश्चित केले. हॉस्पिटल हे प्रयत्न पुढे कायम सुरु ठेवणार असून समुदायासोबतचे आपले प्रयत्न अधिकाधिक मजबूत करणार आहे. सोयीसुविधांपासून वंचित भागांमधील महिलांच्या आरोग्य व पोषणावर विशेष भर देणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments