Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात आजपासून 'सक्षम' संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन दिव्यांगांच्या सक्षमीकरणावर होणार चर्चा;...

पुण्यात आजपासून ‘सक्षम’ संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन दिव्यांगांच्या सक्षमीकरणावर होणार चर्चा; प्रेरक दिव्यांग पाहुणे राहणार उपस्थित तसेच शोभायात्रा आणि प्रदर्शनाचे आयोजन.

पुणे, ता. ०७ : समदृष्टी, क्षमताविकास व संशोधन मंडळ (‘सक्षम’) या दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी वाहिलेल्या राष्ट्रीय संस्थेचे त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत उद्या, शनिवार दिनांक ८ आणि ९ जून रोजी होत आहे,या अधिवेशनाला देशभरातून ५०० जिल्ह्यातील १५०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शुक्रवारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद राज, महामंत्री कमलाकांत पांडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अविनाश वाचासुंदर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे यांनी येथे दिली.

तत्पूर्वी पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनी आणि विविध संस्थांचे स्टॉल्सचे उद्घाटन झाले.

या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन उद्या,शनिवार, दि.८ जून रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष पूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी राहणार आहेत. याशिवाय प्रेरणादायी दिव्यांग अतिथी म्हणून इंदूरचे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जलतरणपटू पद्मश्री सत्येंद्रसिंग लोहिया, महाबळेश्वरचे प्रसिद्ध उद्योजक भावेश भाटिया, अभिनेत्री गौरी गाडगीळ, अहमदाबादचे प्रसिद्ध आयटी उद्योजक शिवम पोरवाल उपस्थित राहणार आहेत.

पत्रपरिषदेत अधिवेशनाची भूमिका मांडताना सक्षमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद राज म्हणाले की, सामाजिक, व्यावहारिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक इत्यादी जीवनाच्या विविध क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींना एकसमानतेचा अनुभव येईल असे वातावरण निर्माण करण्यासाठी सक्षम कटिबद्ध आहे. तसेच, ते स्वावलंबन, स्वाभिमान आणि सन्मानाने जगू शकतात आणि राष्ट्राच्या पुनर्रचनेत सक्रिय भूमिका बजावू शकतात. हा दृष्टिकोन समोर ठेवून या अधिवेशनात चर्चा होणार आहे.

सक्षमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अविनाश वाचासुंदर म्हणाले की, सक्षम ही एक दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणारी संघटना आहे. देशभर, म्हणजे सर्व प्रांतांच्या मध्ये आणि जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे, हे सक्षमचे वैशिष्ट्य आहे. नवीन नियमांच्या प्रमाणे दिव्यांगांचे २१ प्रकार आहेत. या सर्व प्रकारांमध्ये सक्षम कार्य करते आहे. सक्षमचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या व्यक्ती यात सहभागी आहेत. यात डॉक्टर, तांत्रिक विशेषज्ञ म्हणजे ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपीस्ट, ऑप्टिमेट्रीस्ट अशी मंडळी देखील आहेत. दिव्यांग क्षेत्रातील या संघटनेच्या कामाची ओळख व्हावी म्हणून वैद्यक क्षेत्रात काम करणाऱ्या जबाबदार मंडळींसाठी एक कार्यक्रम रविवारी सकाळी साडेअकरा वाजता या अधिवेशनात आयोजित करण्यात आला आहे.

सक्षमचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे म्हणाले की, यंदा सक्षमचे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यामध्ये होत आहे. या अधिवेशनाचे यजमान होण्याचे भाग्य पश्चिम महाराष्ट्राला मिळालेले आहे, पंधराशे कार्यकर्ते सगळे देशभरातून येणार आहेत. हे अधिवेशन अधिक चांगलं व्हावं या दृष्टीने सर्व कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. यामध्ये दोन दिवस खूप चांगले विषय होणार आहेत. दिव्यांगांच्या एकूणच कल्याणासाठी आणि धोरण ठरवण्यासाठी काही विषय या ठिकाणी मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरचे काही कार्यकर्ते सुद्धा यावेळी उपस्थित राहणार करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments