Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुसऱ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2024 स्पर्धेत कुदो संघाला विजेतेपद

दुसऱ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2024 स्पर्धेत कुदो संघाला विजेतेपद

पुणे, 15 जून 2024: पूना क्लब यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2024 स्पर्धेत अंतिम फेरीत सचिन राठी, तनुश्री राठी व देवर्या राठी यांच्या मालकीच्या कुदो संघाने 102 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

पूना क्लब स्विमिंग पूल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत अतुल गोयल यांच्या मालकीच्या गोयल गंगा रियल रिच संघाने 86 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. तर. राकेश नवानी यांच्या मालकीच्या जेट्स संघाने 84 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेत 150 हुन अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेतील विजेत्या कूदो संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा, पूना क्लबचे उपाध्यक्ष व स्पर्धेचे चेअरमन गौरव गढोक, स्पर्धेचे प्रायोजक वेंकीज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालाजी राव व जगदीश राव, एएसआर डॉल्फिन्सचे मालक अमित रोपलेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक तुषार आसवानी, क्लबचे सचिव कर्नल सरकार, क्लबचे समिती सदस्य शुभा गडकरी, समीर संघवी व कुणाल संघवी आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: अंतिम फेरी: प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमानुसार:

10 वर्षांखालील (महिला) फ्री स्टाईल(20मी): 1.समायरा मास्टर (गोएल गंगा रियल रीच, 15:47 से), 2.लारा वासवानी (परमार ऑल स्टार्स, 17:069 से), 3.अनाया पाटील(कूदो, 17:84से);
10 वर्षांखालील (पुरुष) फ्री स्टाईल (20 मी): 1.आरव नंदा(परमार ऑल स्टार्स,18:62से), 2.अयान बाकर(किंग्स,20:97से), 3.अयान बेकर(कूदो,21:32से);
14 वर्षांखालील (11-14वर्षे)(महिला) फ्री स्टाईल(40मी): 1.अनैशा सूद(कूदो,26:22से), 2.मिहिका मोहिते(एएसआर डॉल्फिन्स,27:81से), 3.अनिका शेट्टी(जेट्स,27:88से);
14 वर्षांखालील (11-14 वर्षे) (पुरुष) फ्री स्टाईल(40मी): 1.विहान तुळपुळे(जेट्स,25:34से), 2.रयान संघवी(परमार ऑल स्टार्स,29:06से), 3.अरुल आगरकर(गोयल गंगा रियल रीच,30:84से);
14 वर्षांखालील (11-14वर्षे) (महिला)ब्रेस्टस्ट्रोक(40मी): 1.अनैशा सूद(कूदो,33:81से), 2. तिशा राठी(किंग्स,34:06से), 3.मिहिका मोहिते( एएसआर डॉल्फिन्स,35:36से);
17 वर्षांखालील (15-17 वर्षे) (पुरुष) फ्री स्टाईल (40मी):1.राजवीर पाटील(एएसआर डॉल्फिन्स,22:40से), 2.रौनक माळी(किंग्स,25:41से), 3.आरव बोरवके(जेट्स,25:73से);
23 वर्षाखालील (15-23 वर्षे) (महिला) फ्री स्टाईल(40मी):1.तनुश्री राठी(कूदो,27:59से), 2.झहरा मास्टर(जेट्स,29:63से), 3.निष्का शहा(गोयल गंगा रियल रिच,32:47से);
33 वर्षांखालील (18-33 वर्षे) (पुरुष) फ्री स्टाईल(40मी):1.अहान भिसे(कूडो,23:12से), 2.ई (किंग्स,24:03से), 3.देवर्या राठी(परमार ऑल स्टार्स,25:19से);
23 वर्षांखालील (15-23 वर्षे) (महिला)ब्रेस्टस्ट्रोक(40 मी):1.वेद कनास्तिया( एएसआर डॉल्फिन्स, 38:59से), 2.निष्का शहा(गोयल गंगा रियल रिच,39:34से), 3.जहरा मास्तर(जेट्स,43:00से);
५२ वर्षांखालील (३४-५२ वर्षे) (पुरुष) फ्रीस्टाइल (४० मी):1.आदित्य सिंग(गोयल गंगा रियल रीच,25:87से), 2.प्रमित सूद(जेट्स,27:65से), 3.कुणाल संघवी(परमार ऑल स्टार्स,28:25से);
35 वर्षांखालील(महिला) फ्रीस्टाइल(40मी): 1.अन्नपूर्णा राठी(कूदो,35:40से), 2.नफिसा हाशिम(गोयल गंगा रियल रीच,36:78से), 3.तेहराय विंझनेकर(जेट्स,38:19से);
54 वर्षावरील (पुरुष) फ्री स्टाईल(20मी): 1.दिलीप देशमुख(जेट्स,15:09से), 2.आनंद सरमा(कूदो,18:40से), 3.समीर सय्यद(गोयल गंगा रियल रीच, 18:63से);
बॅकस्ट्रोक खुला महिला(४०मी):1.तिशा राठी(किंग्स,31:47से), 2.तनुश्री राठी(कूदो,33:81से), 3.मिहिका मोहिते(एएसआर डॉल्फिन्स,36:00से);
ब्रेस्टस्ट्रोक खुला पुरुष(40मी):1.राजवीर पाटील(एएसआर डॉल्फिन्स,30:03से), 2.अहान भिसे(कूदो,30:72से), 3.कृष डेमला(किंग्स,33:87से);
बॅकस्ट्रोक खुला पुरुष गट(40 मी): 1.रौनक माळी(किंग्स,28:46से),2.अहान भिसे(कूदो, 29:97से), 3.आरव बोरावके(जेट्स,33:97से);
रिले महिला: फ्री स्टाईल(2×20मी व 2×40मी): 1.परमार ऑल स्टार्स,01:39:40से), 2.जेट्स,01:41:53से), 3.एएसआर डॉल्फिन्स,01:43:47से);
रिले पुरुष: फ्री स्टाईल(2×20मी आणि 3×40मी): 1.गोयल गंगा रियल रीच,01:45:06से), 2.परमार ऑल स्टार्स,01:46:53से), 3.जेट्स,01:47:19से).

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments