फ्लेक्सिबल वर्कस्पेसेसची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी द बोर्डरूम को-वर्किंगने पुण्यामध्ये घेतली ३६,००० चौरस फूट कार्यालयीन जागा
मुंबईमधील प्रसिद्ध को-वर्किंग कंपनी द बोर्डरूम को-वर्किंगने अलीकडेच पुण्यामध्ये आपल्या विशेष कार्यालयीन विस्ताराचे अनावरण केले. एकूण ३६,००० चौ. फूटांचे क्षेत्रफळ असलेल्या या दोन अद्ययावत कार्यालयीन जागांचे उद्घाटन हे द बोर्डरूमच्या नव्या बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्याच्या आणि पुण्यातील व्यावसायिक व व्यापारी संस्थांना सक्षम बनविण्याच्या प्रवासातील एक लक्षणीय टप्पा आहे.
द बोर्डरूम को-वर्किंगने मुंबईतील अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम भागांमध्ये याआधीच ७०,००० चौ. फुटांहून अधिक आकाराच्या कार्यालयीन जागा निर्माण करून आपल्या यशावर आधीच शिक्कामोर्तब केले आहे. अंधेरी पूर्वेचे अंधेरी-कुर्ला रोडवरील मोक्याच्या जागी असलेल्या १०००+ वर्कस्टेशन्स असलेल्या कार्यालयीन जागेचे व्यवस्थापन प्रतिष्ठित आयसीआयसीआय बँकेसाठी करत दर्जेदारपणाबद्दलची त्यांच्या बांधिलकीचे ते मूर्त उदाहरण आहे. को-वर्किंगच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक पसंती मिळविणाऱ्या अंधेरी पश्चिमेच्या कार्यालयाला वॉर्नर म्युझिक, नो ब्रोकर, मीडिया मन्क्स आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यासारख्या प्रतिष्ठित क्लाएन्ट्समुळे दिमाख प्राप्त झाला असून ही बाब पुण्यातील नव्या जागांसाठी प्रेरणादायी ठरली आहे व तिथेही अशाच प्रकारची सर्वोत्कृष्टता जपली जाण्याची हमी मिळाली आहे.
पुण्यातील बाणेर भागामध्ये द बोर्डरूमची एकूण जागा ३६,००० चौ. फूटांहून अधिक मोठी असेल. द प्राइड गेटवे अँड एसबीसी (सदानंद बिझनेस सेंटर) कार्यालयांची जागा बहुराष्ट्रीय कंपन्या, आयटी कंपन्या आणि नव्या युगाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांसाठी आदर्श व्यवस्थापित कार्यलयीन जागा बनली आहे. दोन्ही ठिकाणी भरपूर आधुनिक सोयीसुविधा, सहयोगात्मक कामाच्या जागा आणि सर्जनशीलता व उत्पादकतेची जोपासना करणारे प्रेरणादायी वातावरण आहे, ज्यामुळे कामाच्या नव्या हुरुप वाढविणाऱ्या अनुभवाचे आश्वासन मिळते.
वर्ष २०२४ मध्ये फ्लेक्सिबल वर्कस्पेसेसची बाजारपेठ अर्थात फ्लेक्स मार्केटची पोहोच सर्वदूर विस्तारण्याचे प्रमाण ६.५ टक्के इतके म्हणजे हेच प्रमाण २ ते ३ टक्के असलेल्या एपीएसी क्षेत्राहून अधिक आहे. अपफ्लेक्स ने केलेल्या पाहणीनुसार २०२४ साली फ्लेक्स मार्केटमध्ये सुमारे ६० टक्के वाढ झाली व त्याची उलाढाल प्रतिवर्ष रु. १४,००० कोटींवर पोहोचली आहे. को-वर्किंग उद्योग केवळ वाढत नसून त्याची भरभराट होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्येच झालेल्या व्यवहारांच्या नोंदींमध्ये ४३ टक्के वाढ झाली, कामाच्या लवचिक जागा वापरण्याच्या पद्धतीला आजवरची सर्वाधिक मागणी मिळत आहे. मागणीमध्ये झालेल्या या वाढीमुळे को-वर्किंग जागांकडून आकारल्या जाणाऱ्या मूल्याच्या मोबदल्यात मिळणाऱ्या सेवांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, जिथे सर्व आकाराच्या कंपन्यांना वाजवी दरांत लवचिक कार्यालयीन जागा पुरविल्या जातात आणि आता पुण्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी द बोर्डरूम को-वर्किंग पुण्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करत असून येथील ग्राहकांसाठी सर्वोत्तम फ्लेक्सिबल वर्कस्पेसेस उपलब्ध करून देत आहे.
आपल्या गतीमान व्यावसायिक क्षेत्रासाठी ओळखले जाणारे पुणे एक आघाडीचे शहर म्हणून उदयास आले आहे. नाइट फ्रँक इंडियाच्या ताज्या डेटानुसार हे शहर फ्लेक्स जागांच्या व्यवहारांत अग्रेसर असून या वर्षीच्या केवळ पहिल्या तिमाहीमध्ये १.२ लाख चौ. फूटांच्या जागांचे व्यवहार झाले. मागणीमध्ये झालेली ही वाढ कंपन्या आणि स्वतंत्र व्यावसायिकांकडून को-वर्किंग जागांना दिल्या जाणाऱ्या प्रथम प्राधान्याला प्रतिबिंबित करते.
याविषयी बोलताना द बोर्डरूम को-वर्किंगचे संस्थापक आणि सीईओ मोहित पल्हादे म्हणाले, “पुण्याचे कार्यालयीन जागांच्या सहयोगाच्या क्षेत्रातील प्रमुख स्थान पाहता ही आमच्यासाठी एक धोरणात्मक बाजारपेठ आहे. पुण्यातील आमचे पदार्पण म्हणजे द बोर्डरूमने घेतलेली एक मोठी व लक्षणीय झेप आहे आणि या गतीमान शहरातील व्यवसायांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. हा व्यवसाय विस्तार यशस्वीता आणि सहयोगाला चालना देणाऱ्या नाविन्यपूर्ण कार्यालयीन जागा पुरविण्याप्रती आमच्या बांधिलकीला अधोरेखित करणारा आहे.”
द बोर्डरूम को-वर्किंगचे सह-संस्थापक आणि सीएफओ अमित सी कामेरकर म्हणाले, ”हैदराबाद, बेंगळुरू आणि पुणे यांसारख्या बाजारपेठांमध्ये आपला व्यवसाय विस्तारणे हा आधुनिक मनुष्यबळाच्या बदलत्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही आखलेल्या वाढीच्या धोरणाचा एक भाग आहे. नजिकच्या भविष्यामध्ये जवळपास २ लाख चौ. फूट कार्यालयीन जागेची यात भर टाकण्याचे ध्येय आम्ही आखले आहे व त्यातून भारतभरातील व्यावसायिकांना सक्षम बनविण्याप्रती आमची कटिबद्धता पुन:प्रस्थापित झाली आहे.”
द बोर्डरूमचा पुण्यातील विस्तार नवसंकल्पनांना चालना देण्याप्रती आणि भारताच्या भरभराटीस येत असलेल्या व्यावसायिक क्षेत्रामधील सहयोगाप्रती कंपनीची समर्पितता दर्शविणारा आहे. अत्यंत आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा या जागा आणि सर्वोत्कृष्टतेशी जपलेली बांधिलकी यांच्या साथीने पुण्यातील लवचिक आणि व्यवस्थापित कार्यालयीन क्षेत्राच्या भविष्याची व त्याहीपलीकडील सेवांची व्याख्या नव्याने घडविण्यासाठी द बोर्डरूम को-वर्किंग सज्ज आहे.


