पुणे, दि. २५ : वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील लष्कर वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार ट्रायलक चौक पासून मुफ्ती फौज चौक दरम्यान सार्वजनिक रस्त्याच्या दक्षिण बाजूकडील २१४२, कावेडीया हॉस्पीटल ते २१५०, न्यु बालाजी ट्रेडर्सपर्यंत, उत्तर बाजूस बंगलोर कॅफे ते २१३०, मणियार क्लिनिकपर्यंत तसेच मुपत्ती चौक ते चुडामण तालीम चौक दरम्यान सार्वजनिक रस्त्याच्या दक्षिण बाजूकडील क्लासिक स्केअर बिल्डिंग, शॉप नंबर ५, रॉयल टच येथून ते क्लासिक स्केअर बिल्डिंग शॉप नंबर ६ आणि ७, लाईफकेअर जेनेरिक प्लस फार्मेस मेडीकल दुकानापर्यंत व उत्तर बाजूकडील कल्पतरु अपार्टमेंट मॉर्डन डेअरी फार्म पासून ते न्युयॉर्क वाईन्स या दुकानापर्यंत पी-१,पी-२ दुचाकी वाहनांना पार्किंग करण्यात येत आहे.
मुफ्ती चौक ते चुडामण तालीम चौक या दरम्यान सार्वजनिक रस्त्याच्या दक्षिण बाजूकडील ७४६, भवानी पेठ, येथील कुमार प्रिमियर बिल्डिंग रत्नराज ज्वेलर्स, शॉप नंबर २ ते ७४५, भवानी पेठ, निता हाऊस को-ऑप हौसिंग सोसायटी चंदन ड्रग्ज स्टोअर्सपर्यंत चारचाकी वाहनांना समांतर पार्किंग करण्यात येत आहे.
मुफ्ती चौक ते चुडामण तालीम चौक यादरम्यान सार्वजनिक रस्त्याच्या दक्षिण बाजूकडील स्वयंम क्लिनिक ते अल खलिफा टुर्स अँड ट्रॅव्हलर्स इंडिया प्रा. लिमि, ७३६ भवानी पेठ पर्यत दुचाकी वाहनांना पार्किंग करण्यात येत असून मुफ्ती चौक ते चुडामण तालीम चौक या दरम्यान सार्वजनिक रस्त्याच्या उत्तर बाजूकडील कल्पतरु अपार्टमेंट न्यूयॉर्क वाईन शॉप पासून ते दंत वेदना मदत केंद ७७४, भवानी पेठ भागात नो पार्किंग करण्यात येत आहे.
पार्किंग व्यवस्था बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात ७ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.
0000


