रात्री उशिरा मित्रांसोबत स्नॅक्सचा आस्वाद घेणे मजेदार असू शकते किंवा रात्री उशिरापर्यंत काम करताना स्नॅक्सचा आस्वाद घेणे आवश्यक असू शकते. पण स्नॅक निवडींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अनारोग्यकारक स्नॅक्सची निवड केल्यास वजन वाढू शकते, चयापचय समस्या व पचनासंदर्भात समस्या उद्भवू शकतात. एमबीबीएस व न्यूट्रिशनिस्ट डॉ. रोहिनी पाटील रात्री उशिरा सेवन केल्या जाणाऱ्या स्नॅक्ससाठी बदाम व ग्रीक दहीची शिफारस करतात, कारण ते भूकेचे शमन करतात, वजन कमी करण्यास मदत करतात आणि एकूण आरोग्य उत्तम राखतात. हे फूड्स भूकेचे शमन करण्यासोबत वजन कमी होण्यास व आरोग्य उत्तम राखण्यास देखील मदत करतात.
बदाम: बदाम उत्तम पर्याय आहेत आणि तुमचा पसंतीचा स्नॅक ठरू शकतो, जो मधुमेह व उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या जीवनशैली आजारांमुळे अनावश्यक वजन वाढवण्यावर प्रतिबंध करू शकतो. बदामांमध्ये १५ आवश्यक पौष्टिक घटकांसह प्रोटीन, झिंक, मॅग्नेशियम व डाएटरी फायबर असते. त्यांच्यामध्ये भूकेचे शमन करण्याचे गुणधर्म असतात, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत पोट भरल्यासारखे वाटते आणि फास्ट फूड्स व जंक फूड्सपासून दूर राहण्यास मदत होते. तसेच, त्यामध्ये मॅग्नेशियम असते, हे मिनरल झोपेचा दर्जा सुधारू शकते. या नट्सबाबत सर्वोत्तम बाब म्हणजे त्यांची विविधता, ते भाजून, कच्चे, ओले करून, सोलून किंवा न सोलता सेवन करता येऊ शकतात, पण कोणत्याही स्वरूपात त्यांची पौष्टिकता कायम राहते.
ग्रीक दही: ग्रीक दही रात्री उशिरा स्नॅकसाठी उत्तम पर्याय आहे. ग्रीक दहीमध्ये प्रोटीन संपन्न प्रमाणात असते, ज्यामुळे पोट भरण्यासह भूकेचे शमन होते, ज्यामुळे रात्री उशिरा अनारोग्यकारक स्नॅक्सचे सेवन करण्यावर प्रतिबंध होतो. तसेच, ग्रीक दह्यामधील अमिनो अॅसिड ट्रायप्टोफन पुरेशी झोप मिळण्यास मदत करू शकते. अतिरिक्त स्वाद व पोषणासाठी ताजी फळे, बदाम किंवा मधासह ग्रीक दह्याचे सेवन करा.
चेरी टोमॅटोज: चेरी टोमॅटोमध्ये कॅलरी कमी प्रमाणात आणि फायबर उच्च प्रमाणात असते, ज्यामुळे ते वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी योग्य पर्याय आहेत. या टोमॅटोमध्ये अॅण्टीऑक्सिडण्ट लायकोपीन देखील असते, जे झोपेचा दर्जा सुधारू शकते. हलके व रिफ्रेशिंग स्नॅक असलेले चेरी टोमॅटो कच्चे सेवन करता येऊ शकतात किंवा रात्री उशिरा पौष्टिक ट्रीटसाठी कॉटेज चीजसह सेवन करता येऊ शकतात.
कॉटेज चीज: कॉटेज चीज आणखी एक प्रोटीन-संपन्न पर्याय आहे, ज्यामध्ये कॅलरी कमी असतात, ज्यामुळे रात्री उशिरा स्नॅकसाठी उत्तम पर्याय आहेत. ते केसिन प्रोटीन देते, जे हळूहळू पचते आणि रात्रभर भूक न लागण्याची खात्री देते. तसेच, तुम्ही झोपले असताना प्रोटीनमुळे स्नायूदुखी बरी होण्यासह स्नायूबळ वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
किवी: किवी हे व्हिटॅमिन्स, मिनरल्स व फायबरने संपन्न कमी-कॅलरी फळ आहे. या फळामध्ये न्यूरोट्रान्समीटर सेरोटोनिन देखील असते, जे झोपेचे नियमन करण्यास मदत करू शकते. रात्री झोपण्यापूर्वी किवी फळ सेवन केल्यास रात्रभर आरामदायी झोप मिळू शकते.
उकडलेली अंडी: उकडलेली अंडी सोईस्कर फूड पर्याय आहेत, ज्यामध्ये प्रोटीन उच्च प्रमाणात असण्यासोबत कॅलरीज कमी असतात. ते मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक पौष्टिक घटक कोलिनचा उत्तम स्रोत देखील आहेत.
लक्षात ठेवा, रात्रीच्या वेळी, विशेषत: झोपण्यापूर्वी स्नॅक्सचा आस्वाद घेताना प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. अतिप्रमाणात सेवन टाळण्यासाठी योग्य व भूकेचे शमन करणाऱ्या स्नॅक्सची निवड करा. तसेच, हे स्नॅक्स झोपण्याच्या किमान एक तास अगोदर सेवन करणे देखील महत्त्वाचे आहे, ज्यामुळे फूड योग्यप्रकारे प


