Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिटी तर्फे भारतासाठी मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून जीगर शाह यांची नियुक्ती

सिटी तर्फे भारतासाठी मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून जीगर शाह यांची नियुक्ती

भारतातील सिटीच्या विकास धोरणाला पाठबळ आणि आर्थिक नेतृत्व करण्यासाठी जीगर यांना केले पाचारण

 

मुंबई: सिटी तर्फे १ जून २०२४ पासून आपल्या भारत फ्रँचायझीसाठी मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून जीगर शाह यांची नियुक्ती झाल्याचे आज जाहीर करण्यात आले. या भूमिकेत, जीगर भारतातील आर्थिक बाबींसाठी एकल संपर्क बिंदू म्हणून काम करतील आणि भारतासाठीचे सिटी कंट्री ऑफिसर आणि भारतीय उपखंडासाठी बँकिंग प्रमुख आशु खुल्लर यांना धोरणात्मक आर्थिक व्यवस्थापन पाठबळ पुरवतील.

 

 

 

जीगर यांना सिटीच्या व्यवसायांमध्ये आर्थिक आणि नियामक अहवाल, ऑडिट, नियामक परीक्षा आणि धोरणात्मक वित्त उपक्रम चालविण्याचा १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते फेब्रुवारी २०२४ पासून भारतासाठी अंतरिम सीएफओ म्हणून काम करत होते.

 

 

 

आशु खुल्लर म्हणाले, “जीगर यांचे भारतातील आमच्या कामकाजा संबंधीचे सखोल ज्ञान आणि आर्थिक व्यवस्थापनातील सिद्धहस्त कामगिरी यामुळे ते या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी अत्यंत योग्य आहेत. आम्ही भारतातील आमच्या ग्राहकांना प्रीमियम सेवा वितरीत करत असताना आणि आमचे धोरण राबवताना त्यांची नियुक्ती मजबूत आर्थिक नेतृत्व प्रदान करेल.”

 

 

 

सिटीच्या एशिया साउथ क्लस्टरचे सीएफओ मुई-इंग टीओ म्हणाले, “मला विश्वास आहे की धोरणात्मक भारतीय बाजारपेठेत सिटीच्या विकास महत्त्वाकांक्षेला पाठिंबा देण्यासाठी जीगर यांचे कौशल्य बहुमोल ठरेल. त्यांचे नेतृत्व आमच्या व्यवसायात आर्थिक शिस्त आणि नियंत्रणावर सतत लक्ष केंद्रित करण्याचे सुनिश्चित करेल.”

 

 

 

“जीगर यांनी सिटी मध्ये वित्त क्षेत्रात अनेक नेतृत्वविषयक भूमिका पार पाडल्या आहेत आणि ही नवीन भूमिका पार पाडण्यासाठी त्यांच्याकडे त्या संदर्भातील अनुभव आणि कौशल्य आहे. त्यांची नियुक्ती ही सिटी मध्ये आपल्या अंतर्गत क्षेत्रातील प्रतिभा कशी फुलवली जाते आणि व्यावसायिक प्रगतीसाठी अतुलनीय संधी प्रदान केल्या जातात याचे उत्तम उदाहरण आहे,” असे सिटी इंडिया प्रमुख एचआर अधिकारी आणि भारतीय उपखंड एचआर प्रमुख आदित्य मित्तल म्हणाले.

 

 

 

 

 

आपल्या नियुक्ती बद्दल जीगर शाह म्हणाले, “सिटी इंडिया साठी सीएफओचे पद स्वीकारणे हा मला माझा सन्मान वाटतो. आमच्या नेतृत्वाच्या टीमसोबत जवळून काम करण्याची आणि सिटी च्या भारतीय बाजारपेठेसाठी दीर्घकाळापासून असलेल्या बांधिलकीवर आधारित आर्थिक व्यवस्थापन पुरविण्याची ही एक रोमांचक संधी आहे.”

 

 

 

जीगर हे भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेतून चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांच्या अंतरिम सीएफओच्या भूमिकेपूर्वी, त्यांनी सिटीच्या दक्षिण आशिया क्लस्टरसाठी क्लस्टर कंट्रोलर म्हणून काम केले. इंडिया सीएफओ म्हणून जीगर सिटीच्या एशिया साउथ क्लस्टरसाठीचे सीएफओ मुई-इंग टीओ यांना रिपोर्ट करतील.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments