Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुसऱ्या पूना क्लब रॅकेट लीग 2024 स्पर्धेत एकूण 220 खेळाडू सहभागी ...

दुसऱ्या पूना क्लब रॅकेट लीग 2024 स्पर्धेत एकूण 220 खेळाडू सहभागी स्पर्धेस आज( 28 जून)पासून प्रारंभ

पुणे, 27 जुन 2024- पूना क्लब लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित दुसऱ्या पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत 8 संघात 220 खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा पूना क्लबच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन, स्क्वॅश कोर्टवर दि. 28 जूनपासून सुरू होणार आहे.

 

 

 

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पूना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष सुनील हांडा आणि उपाध्यक्ष गौरव गढोके यांनी सांगितले की, क्लबच्या सभासदांकरिता क्रिकेट, स्नूकर, स्विमिंग, फुटबॉल, हेल्थ अँड फिटनेस आणि इतर सर्व रॅकेट क्रीडा प्रकारांमध्ये अशा सहा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात लीग स्पर्धा आयोजित करणारा पूना क्लब हा शहरांतील एकमेव क्लब आहे. तसेच या क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून सदस्यांना मनोरंजनबरोबरच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यास महत्वपूर्ण ठरेल.

 

 

 

विविध क्रिडाप्रकारांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी पुना क्लब नेहमीच आघाडीवर असतो. या स्पर्धेला ग्रॅविटस फाउंडेशन यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले कॉन्व्हेकस यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. लिलावात नितीन किर्तने (6250गुण, एचके पावरहाऊस), अर्णव सरिन (6250गुण, जॅग्वार्स), यांना आपल्या संघात कायम ठेवले आहे. याशिवाय रणजीत बाला(5000गुण, एएसआर स्ट्रायकर्स), टोनी शेट्टी(4200गुण, हिलयॉस इगल्स), नित्या शहा(4100गुण, ऑल स्टार्स)हे सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. कारा इंटलेक्ट यांच्या संकल्पेनेतून व व्यवस्थापनेतून ही स्पर्धा होत आहे.

 

 

पूना क्लब लिमिटेडच्या रॅकेट स्पोर्ट्स समितीचे अध्यक्ष आणि या लीगचे चेअरमन अमेय कुलकर्णी यांनी सांगितले की, गतवर्षीच्या मालिकेत. क्लबमधील 135खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. सभसदांमधील दरवर्षी या स्पर्धेची लोकप्रियता वाढत चालली असून यावर्षीच्या स्पर्धेत 220खेळाडूंनी आणि 8 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

 

 

 

या लढतीमध्ये दोन्ही संघात मिळून बॅडमिंटन व टेबल टेनिस, टेनिस, स्क्वाश प्रकारात असे एकूण 16 सामने होणार आहेत. तसेच, प्रत्येक क्रीडा प्रकारात खेळाडूला त्याच्या खेळातील क्षमतेनुसार स्टार देण्यात येणार आहे. तसेच, स्पर्धेत या चारही क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार असल्याचे त्यांनी नमुद केले.यामध्ये प्रत्येक क्रीडा प्रकारातील पहिला सामना 11 गुणांचा, तर दुसरा व तिसरा सामना 15 गुणांचा आणि चौथा सामना 31 गुणांचा असणार आहे. या टायमधील सर्वाधिक गुणांची कमाई करणारा संघ सामन्यातील विजेता ठरणार आहे. सामन्यात बरोबरी झाल्यास दोन्ही संघांमध्ये गोल्डन पॉईंट सामना खेळविण्यात येणार आहे. बॅडमिंटन, टेनिस व टेबल टेनिस प्रकारात दुहेरी सामने तर, स्क्वाश प्रकारात एकेरी सामने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

स्पर्धेसाठी 220खेळाडूंची निवड लिलाव पध्दतीने करण्यात आली असून हे खेळाडू आठ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धेतील सहभागी संघ व संघमालक यामध्ये मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स(मनप्रीत उप्पल व गौरव गढोके), ओबेरॉय अँड निल किंग्ज(वीरेंदर सिंग ओबेरॉय व इंद्रनील मुजगुले), कॉन्व्हेकस शार्क्स(कृष्णा व देव गुहवालेवाला), एचके पावरहाऊस(सुनील हांडा व आदित्य कानिटकर), मानव अव्हेंजर्स(रुपेश भाटिया), एएसआर स्ट्रायकर्स(अमित रोपलेकर, सरिम खान, योगेश अंकले सरिया), हिलयॉस ईगल्स(सलील भार्गवा), परमार ऑल स्टार्स(हिरेन परमार व मृणाल शहा) हे आठ संघ सहभागी झुंजणार आहेत.

 

 

 

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अमेय कुलकर्णी(स्पर्धा समिती अध्यक्ष), आदित्य कानिटकर, विराफ देबू, पंकज शहा, समीर संघवी, कुणाल संघवी, क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा, उपाध्यक्ष गौरव गढोक आणि रणजीत पांडे यांचा

समावेश आहे.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments