Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रा.डाॅ वि.ल. धारुरकर लिखित ‘रामप्रसाद बिस्मिल यांची आत्मकथा’ ग्रंथाचे प्रकाशन*

प्रा.डाॅ वि.ल. धारुरकर लिखित ‘रामप्रसाद बिस्मिल यांची आत्मकथा’ ग्रंथाचे प्रकाशन*

 

 

पुणे, दि.२७ : ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा.डॉ. वि.ल. धारुरकर लिखित ‘रामप्रसाद बिस्मिल यांची आत्मकथा’ या मराठीमध्ये भाषांतरित ग्रंथाचे ग्लोरिया ग्रेस सोसायटी येथे प्रबोधिनीच्यावतीने ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयंत फडके, यशदाचे बबन जोगदंड, श्रीनिवास तिघरे, प्रा. दत्तात्रय पाचखेडे, प्रकाश देशपांडे, जयंत पाचपोर, आनंद दाते, अनिल फौजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी डॉ .धारुरकर यांनी शिवचरित्रातील महत्त्वाचे प्रसंग विशद केले. ते म्हणाले, शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेकानंतर हिंदवी स्वराज्याची मधूर फळे संपूर्ण भारतामध्ये पोहोचवली. संपूर्ण दक्षिण भारतामध्ये सांस्कृतिक समानता स्थापन केली. शिवाजी महाराज हे मध्ययुगीन जगाच्या इतिहासातील महान कर्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी कल्याणकारी राज्याची स्थापना केली. महाराजांनी राज्याभिषेकानंतर रायगडावर ३०० फॅक्टरी स्थापन केल्या. सोन्याच्या चलनाचा प्रसार, भक्कम आरमार, भारताला अनुकूल विदेशी व्यापारशर्ती,आफ्रिकेत एडन येथे आरमारी स्थळ उभे करण्याची योजना महाराजांची होती. सामान्य माणसाचा सन्मान, महिलांचा सन्मान, शेतकऱ्यांचे कल्याण, लोकाभिमूख प्रशासन ही हिंदवी स्वराज्याची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

 

प्रास्ताविकात श्रीनिवास तिघरे यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व सांगितले तर अनिल साठ्ये यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments