Tuesday, September 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून आगामी गॅलॅक्‍सी झेड सिरीज फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍ससाठी प्री-रिझर्व्‍हचा शुभारंभ

सॅमसंगकडून आगामी गॅलॅक्‍सी झेड सिरीज फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍ससाठी प्री-रिझर्व्‍हचा शुभारंभ

गुरूग्राम, भारत – जुलै १, २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने सांगितले की, ग्राहक आता त्‍यांचे आगामी गॅलॅक्‍सी झेड सिरीज फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍स प्री-रिझर्व्‍ह करू शकतात, ज्‍यामुळे ते लवकर उपलब्‍धता व स्‍पेशल ऑफर्ससाठी पात्र ठरतील.

 

ग्राहक Samsung.com, सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्टोअर्स, Amazon.in, Flipkart.com आणि भारतभरातील आघाडीच्‍या रिटेल आऊटलेट्समध्‍ये २००० रूपयांची टोकन रक्‍कम भरत आगामी गॅलॅक्‍सी झेड सिरीज फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍स प्री-रिझर्व्‍ह करू शकतात. आगामी गॅलॅक्‍सी झेड सिरीज स्‍मार्टफोन्‍स प्री-रिझर्व्‍ह करणाऱ्या ग्राहकांना या उत्‍पादनांच्‍या खरेदीवर जवळपास ७००० रूपयांचे फायदे मिळतील.

 

सॅमसंगने नुकतीच घोषणा केली की, कंपनी १० जुलै रोजी जागतिक इव्‍हेण्‍टमध्‍ये नेक्‍स्‍ट जनरेशन गॅलॅक्‍सी झेड सिरीज स्‍मार्टफोन्‍स व इकोसिस्‍टम डिवाईसेस लाँच करणार आहे. पॅरिसमध्‍ये गॅलॅक्‍सी अनपॅक्‍ड इव्‍हेण्‍टचे आयोजन करण्‍यात येणार आहे, जेथे प्रतिष्ठित सांस्‍कृतिक नेक्‍सस व ट्रेण्‍ड एपिकसेंटर आमच्‍या नवीन अत्‍याधुनिक इनोव्‍हेशन्‍सच्‍या लाँचसाठी परिपूर्ण गंतव्‍य बनेल, असे सॅमसंगने एका निवेदनामध्‍ये सांगितले.

 

“गॅलॅक्‍सी एआयचे भावी फ्रण्‍टीयर येत आहेत. गॅलॅक्‍सी एआयच्‍या क्षमतेचा अनुभव घेण्‍यास सज्‍ज राहा, या क्षमता आता नवीन गॅलॅक्‍सी झेड सिरीज आणि संपूर्ण गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टममध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आल्‍या आहेत. संभाव्‍यतांच्‍या विश्‍वाचा अनुभव घेण्‍यास सज्‍ज राहा, जेथे आम्‍ही मोबाइल एआयच्‍या नवीन टप्‍प्‍यामध्‍ये प्रवेश करत आहोत,” असे कंपनीने सांगितले.

 

सॅमसंग इंडियाने आगामी सॅमसंग गॅलॅक्‍सी वीअरेबल्‍स आणि हिअरेबल डिवाईसेससाठी देखील प्री-रिझर्व्‍हची घोषणा केली. ग्राहक १९९९ रूपयांच्‍या टोकन रक्‍कमेसह सॅमसंगची आगामी गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टम उत्‍पादने प्री-रिझर्व्‍ह करू शकतात आणि या उत्‍पादनांच्‍या खरेदीवर जवळपास ६४९९ रूपयांच्‍या फायद्यांचा आनंद घेऊ शकतात.

 

सॅमसंग पूर्णत: नवीन व अद्वितीय एआय अनुभव देण्‍यासाठी आगामी फोल्‍डेबल डिवाईसेसकरिता गॅलॅक्‍सी एआय अनुभव ऑप्टिमाइल करेल, असे विश्‍लेषकांनी सां

गितले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments