पुणे १ जुलै २०२४ : वर्ल्ड सीफेरर्स डे निमित्त पुण्यात रविवारी पीवायसी जिमखाना येथे इन्स्टिट्युट ऑफ मरिन इंजिनिअर्स इंडिया,पुणे, इंडियन मरिटाईम फाऊंडेशन आणि द कंपनी ऑफ मास्टर मरिनर्स ऑफ इंडिया या शिपिंग उद्योगाशी निगडित संस्थांतर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये १०० हुन अधिक नाविक व्यावसायिकांनी सहभाग घेतला. या प्रसंगी ट्रेनिंग शिप रहमान संस्थेचे प्राचार्य कॅप्टन (डॉ )आशुतोष अपांडकर, तोलानी मरीटाईम इन्स्टिटयूट चे प्राचार्य कॅप्टन इंद्रनाथ बॅनर्जी ,इंडियन मरिटाईम फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन आनंद दीक्षित ,इन्स्टिट्युट ऑफ मरिन इंजिनिअर्स इंडिया,पुणे चे अध्यक्ष व माजी मुख्य अभियंते संजीव ओगले , द कंपनी ऑफ मास्टर मरिनर्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीरंग गोखले, इंडियन कोस्टल ऑपरेटर्स या संघटनेचे माजी अध्यक्ष आणि कंपनी ऑफ मास्टर मरिनर्स ऑफ इंडियाचे माजी सदस्य कॅप्टन सुधीर सुभेदार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात चर्चासत्र व सांगीतिक कार्यक्रमाचा समावेश होता. ‘नॅव्हिगेटिंग द फ्युचर : सेफटी फर्स्ट ‘ या इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन ( आयएमओ ) च्या संकल्पनेशी सुसंगत हा कार्यक्रम होता.


